Sureshkumar Passes Away : अजितदादांचे विश्वासू, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

Former MLA Sureshkumar Jethaliya : माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे निधन झाले.
  Sureshkumar Jethaliya Passes Away
Former MLA Sureshkumar Jethaliyasarkarnama
Published on
Updated on

Sureshkumar Jethaliya News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अजित पवारांचे यांचे विश्वासू म्हणून सुरेशकुमार यांची ओळख होती. जालन्यातली परतूर विधानसभेचे ते माजी आमदार होते. काँग्रेस पक्षाकडून त्यांनी आमदारकी मिळवली होती. 2009 मध्ये ते आमदार झाले होते.

आज पहाटेच्या त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना तत्काळ जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वनीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारले होते. मात्र, निवडणूक लढण्याचा निर्णय घेत ते अपक्ष म्हणून उभे राहिले होते. त्यांनी तब्बल 58 हजार मतं घेत आपली ताकद दाखवून दिली होती. पुढे त्यांनी थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. अजित पवारांचे विश्वासू नेते म्हणून ते राष्ट्रवादीमध्ये परिचित झाले होते. मात्र, अजित पवारांच्या निधनाच्या तीन महिन्यांत त्यांचे देखील हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com