Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना गुड न्यूज, 'या' तारखेला मिळणार जानेवारी महिन्याचे पैसे!

Ladki Behan Scheme Funds : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने महायुतीला बंपर यश मिळवून दिले. त्यामुळे महायुतीने दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करणार असल्याच्या महायुतीच्या नेत्यांनी सांगितले.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हफ्ता मिळणार की नाही, याबाबत महिलांमध्ये संभ्रम होता. जानेवारी महिन्याचे 15 दिवस होऊन गेले तरी हफ्ता खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणी चिंतेत होत्या. मात्र, लाडक्या बहि‍णींचा चिंता सरकारने दूर केली आहे. पैसे कधी जमा होणार याची माहिती आता समोर आली आहे.

लाडक्या बहि‍णींचा जानेवारीमधील हफ्ता हा 26 जानेवारीच्या आधी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत हफ्ता जमा होईल, अशी खात्रीलायक माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने महायुतीला बंपर यश मिळवून दिले. त्यामुळे महायुतीने दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करणार असल्याच्या महायुतीच्या नेत्यांनी सांगितले. मात्र, हे पैसे कधी मिळणार याचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. डिसेंबर महिन्याचा हफ्ता 1500 रुपये महिलांच्या खात्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला होता.

Ladki Bahin Yojana
Trupati Desai Allegations : संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप; म्हणाल्या, कराड अन् चाटे...

मार्चनंतर मिळणार 2100 रुपये

लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात 2100 रुपये मार्चनंतरच जमा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील मार्चनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडकी योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'त्या' बहि‍णींचे अर्ज होणार बाद

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सरसकट देण्यात आलीची चर्चा आहे. मात्र, आता सरकारकडून पडताळणी करत ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहने आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार असल्याची माहिती आहे तसेच आर्थिकदृष्टा सक्षम असूनही लाभ घेणाऱ्या महिलांनी स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana
Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटलांचा राम सातपुतेंवर हल्लाबोल; म्हणाले ‘काही पराभूत लोक विकासकामांत लुडबूड...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com