Trupati Desai Allegations : संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप; म्हणाल्या, कराड अन् चाटे...

Trupati Desai On Santosh Deshmukh Murder Case : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी (ता.16) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी बीड हत्या प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर काही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
Trupati Desai On Walmik Karad and Vishnu Chate .jpg
Trupati Desai On Walmik Karad and Vishnu Chate .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं असतानाच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड याच्या संदर्भातील माहिती माध्यमांना देत काही गंभीर आरोप केले आहेत. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांबाबत देखील तृप्ती देसाई यांनी वक्तव्यं केलं आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी (ता.16) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी बीड हत्या प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर (Walmik Karad) काही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

देसाई म्हणाल्या, संतोष देशमुख यांच्या खून झाल्यानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत असताना 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दिंडोरीला आश्रमात मुक्कामाला होते. जर आश्रमात त्यांना वास्तव्याला जागा दिली असेल तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी आपली मागणी असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलं.

Trupati Desai On Walmik Karad and Vishnu Chate .jpg
Shivsena News : शिंदेंच्या मंत्र्यासमोरच बॉडीगार्ड-पोलिसांत राडा; नेमकं काय घडलं...

ज्या आश्रमात वाल्मिक कराड वास्तव्याला होता. त्या आश्रमाबाबत माझ्याकडे काही तक्रारी आल्या आहेत.या संदर्भात मागील वर्षी जानेवारीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथिगृहात बैठक लावली होती.पण कराडने या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून ते दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला.

Trupati Desai On Walmik Karad and Vishnu Chate .jpg
Saif Ali Khan Attack Updates Video : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याने केली एक कोटीची मागणी, धक्कादायक माहिती समोर

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असताना देखील मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे त्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.फडणवीस हे मुंडे यांचे जिवलग मित्र आहेत.त्यामुळे हा तपास सरळ मार्गी कसा होईल,असं प्रश्नचिन्ह तृप्ती देसाईंनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com