Mahayuti News: एकदा धोका दिला, आता महायुतीची गरज नाही, अजितदादांच्या आमदारानं ठणकावलं

Dharamrao Baba Atram on local body elections 2025:गडचिरोलीत आम्हाला महायुतीच गरज नाही. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढणार आहोत आणि एकहाती सत्ता आणून दाखवतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
Ajit Pawar Mahayuti News
Ajit Pawar Mahayuti News Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने राज्याचे माजी वनमंत्री धर्मराव बाबा आत्राम चांगलेच चिडले आहे. एकेकाळी अजित पवार आणि देवेंद्र पडणवीस आमचे नेते असल्याचे सांगून त्यांनी महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यावरचा पालकमंत्रीपदाचा आपला दावाही सोडला होता. आता मात्र त्यांनी उघडपणे महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान दिले आहे.

गडचिरोलीत आम्हाला महायुतीच गरज नाही. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढणार आहोत आणि एकहाती सत्ता आणून दाखवतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर आणि अमरावती विभागातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आत्राम यांनी रोखठोक भाषण केले. कोणी नाराजी होईल याचीही तमा त्यांनी बाळगली नाही. सोबतच विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला लोकांनी धोका दिला. महायुतीच्या नेत्यांनी बडखोरांना आर्थिक मदत केली असा थेट आरोपही त्यांनी केला.

Ajit Pawar Mahayuti News
Vaishnavi Hagwane: फरार हगवणे बाप-लेकाचा हॉटेलमध्ये मटणावर ताव; पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट? वैष्णवीच्या वडीलांचा दावा

आता मात्र कोणाला सोडणार नाही, मी जे काही बोलतो ते स्पष्टच बोलतो, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणू असाही दावा त्यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीत बाबा आत्राम यांच्या मुलीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. भाजपचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री तसेच आत्राम यांचे पुतणे अंबरीश आत्राम यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली होती.

Ajit Pawar Mahayuti News
Muhammad Yunus News: बांगलादेशात पुन्हा उलथापालथ; मोहम्मद युनूस राजीनामा देणार

बाबा आत्राम यांचा सर्व रोख भाजप आणि अंबरीश आत्राम यांच्यावर होता. महायुतीच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये धर्मराव बाबा आत्राम वनमंत्री होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. बाबा आत्राम गडचिरोलीचे असतानाही त्यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व सोपण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदावर दावा केला नव्हता.

महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर आत्राम यांचे मंत्रिमंडळाचे स्थान पक्के मानले जात होते. त्यांनी मंत्रिमंडळाच्या स्थापनेपूर्वीच गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावासुद्धा केला होता. मात्र त्यांना अजित पवार यांनी मंत्रिमंडळातूनच डच्चू दिला. यावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी अडीच वर्षे प्रतीक्षा करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com