Sambhajiraje Meets CM Pramod Sawant : संभाजीराजेंनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट; 'या' खास विषयावर झाली चर्चा

Sambhajiraje Political News : मुख्यमंत्री सावंत आणि संभाजीराजेंनी या भेटीची माहिती X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
Sambhajiraje Meet CM Pramod Sawant.jpg
Sambhajiraje Meet CM Pramod Sawant.jpgSarkarnama
Published on
Updated on

Panji News : माजी खासदार तसेच रायगड संवर्धन समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गुरुवारी (ता.26 ) भेट घेतली. या भेटीत गोव्याचा ऐतिहासिक वारसा आणि गड - किल्ल्यांचा संस्कृतीला उजाळा देण्यात आला. मुख्यमंत्री सावंत आणि संभाजीराजेंनी (Sambhajiraje Chhatrapati) या भेटीची माहिती X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी संभाजीराजे यांच्यासोबत झालेल्या भेटीचा फोटो त्यांच्या अधिकृत x खात्यावरुन शेअर केला आहे. सावंत यांनी यावेळी संभाजीराजेंना संदीप मुळीक लिखित गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात गोव्यातील गडकिल्ल्यांचा वारसा सविस्तरपणे चित्रीत करण्यात आला आहे.

संभाजीराजे यांनी देखील या भेटीचा फोटो एक्सवरुन शेअर केला आहे. "गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गोमांतकीय दुर्गाच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात श्री शिवछत्रपती महाराज आणि शिवपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यात केलेल्या पराक्रमांची आणि गडकिल्ल्यांच्या महत्त्वाची सविस्तर माहिती दिली आहे."

Sambhajiraje Meet CM Pramod Sawant.jpg
Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंच्या शहराध्यक्षाची होणार सुनावणी, संचालकपद होणार रद्द? 'हे' आहे कारण

यावेळी दुर्गराज रायगड किल्ल्याचे चाललेले संवर्धन, तसेच महाराष्ट्र आणि गोव्यामधील इतर गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वतः शिवप्रेमी असल्यामुळे त्यांचा मराठ्यांच्या इतिहास आणि गडकिल्ल्यांविषयी असलेला आत्मीयतेचा दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवला. त्यांच्या सहकार्याने किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला जाईल, असा विश्वास वाटतो", असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com