
Kolhapur News : कर्जाची रक्कम थकबाकी असेल तर कोणत्याही सहकारी संस्थेवर संचालकपदावर राहता येत नाही, या सहकाराच्या नियमावर बोट ठेवत भगवान पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena) शहराध्यक्ष आणि शेतकरी संघाचे संचालक सुनील मोदी यांना जयसिंगपूर येथील श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थेची थकबाकी ठेवल्याचा आरोप करण्यात आले आहे.
या आरोपांनंतर त्यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली होती. दरम्यान, या मागणीनुसार आता सुनील मोदी यांची नोटीस पाठवून सुनावणी घेतली जाणार आहे. त्याबाबतची माहिती जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी दिली आहे.
सहकारातील नियमानुसार सहकारी बँकेच्या कर्जाचे थकबाकीदार असल्यास दुसऱ्या संस्थेत संचालकपदावर राहता येत नाही. याच कारणाने यापूर्वी शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील हे भूविकास बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीनुसार त्यांना संचालक आणि अध्यक्षपदावरून कमी करण्यात आले होते.
आता शेतकरी संघातील दुसरा प्रकार समोर आला आहे. वरणगे येथील भगवान पाटील यांनी शेतकरी संघाचे संचालक आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे कोल्हापूर (Kolhapur) उत्तर शहराध्यक्ष सुनील मोदी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
सुनील मोदी हे जयसिंगपूर येथील श्री दत्त नागरी सहकारी संस्थेतील कर्ज घेतले होते. त्याचे ते थकबाकीदार आहेत. त्यामुळे शेतकरी संघातील त्यांचे संचालक पद रद्द करावे अशी मागणी भगवान पाटील यांनी केली होती.
यानंतर मोदी यांच्याशी संपर्क साधला असता आपण घेतलेले कर्ज वेळीच फेडले आपला चा दावा केला होता. मात्र भगवान पाटील यांच्या दाखल तक्रारीनुसार सुनील मोदी यांच्याबाबतीत दिलेल्या तक्रार अर्जावर सुनावणी होणार आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात मोदी यांना नोटीस पाठवणार असल्याचंही जिल्हा उपनिबंधक खरे यांनी स्पष्ट करत मोदी हे थकबाकीदार असल्यास ते संघाच्या संचालकपदासाठी अपात्र ठरू शकतात. मात्र, त्यांनी संबंधित पतसंस्थेची थकबाकी भरली असेल तर मात्र त्यांचे पद कायम राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.