Gokul Dairy Election: 'गोकुळ'निवडणूक बिनविरोध? जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा; अध्यक्षपदाचेही सूत्र निश्चित?

Gokul Dairy Election News update: : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग. जागावाटपाचा फॉर्म्युला आणि अध्यक्षपदाच्या सूत्राची चर्चा; अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
Gokul Dairy Election News update
Gokul Dairy Election News updateSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: गेल्या तीन महिन्यांपासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून महायुतीमधील संघर्ष पेटला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असताना गोकुळ दूध संघाच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे.

निवडणुकीतून होणारे आरोप प्रत्यारोप, त्यासाठी लागणारा वेळ, होणारा वारेमाप खर्च आणि एकमेकांचे गोकुळमधील अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकरी संघाप्रमाणे गोकुळ दूध संघामध्ये देखील सर्वपक्षीय नेते एकत्र येत बिनविरोध निवडणूक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वपक्षीय नेत्यांमध्ये जागा वाटपाचे सूत्र देखील ठरले आहे. अध्यक्षपदाचाही फॉर्मुला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणीही दुजोरा दिला नाही.

गोकुळ दूध संघामधील सत्ता वाचवण्यासाठी महायुती मधील नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. अशातून पात्र-अपात्र संस्थाचे राजकारण उफाळून आले. त्यामुळे महायुतीतील नेत्यामधील वाद चव्हाट्यावर आले आहे. शिवाय निवडणुकीत ठरवाला महत्व असल्याने त्याचे दर गगनाला भिडले आहेत. नेत्याच्या आणि संचालकांच्या मतभेदामुळे गोकुळ दूध संघाची नाहक बदनामी राज्यभर झाली.

Gokul Dairy Election News update
Farm Loan Waiver First List: कर्जमाफीवर फडणवीसांची मोठी घोषणा! पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर होणार?

त्यामुळे गोकुळची ही निवडणूक सर्वांच्या सहकार्याने व्हाव्यात अशी इच्छा अनेक संचालकांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या नेत्या आणि संचालिका शोमिका महाडिक यांनी यापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे. मात्र तत्पूर्वी गोकुळ दूध संघाची निवडणूक ही बिनविरोध करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यासंदर्भात फॉर्म्युला देखील ठरल्याची माहिती समोर येत आहे.

गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक ही बिनविरोध करण्याची प्रयत्न सुरू असून त्यामध्ये सर्वाधिक जागा भाजपकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस तर शिवसेनेला तीन नंबरचे स्थान देण्यात आल्याची माहिती आहे. तर जनसुराज्य शक्तीला यंदा आणखी दोन जागा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीला दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. स्वीकृत संचालकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा देण्याचे सूत्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. संभाव्य जागा वाटपाचा फॉर्मुला भाजप 8-9, राष्ट्रवादी काँग्रेस 6, शिवसेना 5, जनसुराज्य 3-4, आणि महाविकास आघाडीला 2 जागा देण्याचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.

Gokul Dairy Election News update
Delhi Protest: दिल्ली हायअलर्टवर! जंतर-मंतरवर CJP चा एल्गार, शंभू-खनौरी सीमेवर हजारो शेतकऱ्यांचा गराडा

अध्यक्ष पदाचे सूत्रही ठरले?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील जागा वाटपाचा फॉर्मुला सोबत अध्यक्षपदाचे सूत्रही ठरल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये भाजप दोन वर्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि जनसुराज्य ला प्रत्येकी एक वर्ष असे सूत्र ठरल्याचे देखील सांगितले जात आहे.

याबाबत काही संचालकांशी चर्चा केली असता याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत अंतिम यादी समोर येत नाही तोपर्यंत निर्णय होणार नाही, तसा निर्णय घ्यायचा झाल्यास वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असेही सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com