

Farm Debt Relief News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारच्या बहुचर्चित कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आता शक्यता आहे की, उद्याच अजितदादांच्या जयंतीचं औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी बाबासाहेब पाटील तयारी करत आहे’. फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध होणार आहे. या यादीकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्जमाफीची अंमलबजावणी अपेक्षेपेक्षा लांबल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यापूर्वी 30 जून आणि त्यानंतर 5 जुलै या दोन तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने विरोधकांनी सरकारवर 'तारीख पे तारीख' देत शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.
राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांची तरतूद पुरवणी अर्थसंकल्पातून केली आहे. मात्र, लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष निश्चित करताना काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याने प्रक्रिया पुढे ढकलावी लागली. त्यानंतर सरकारने निकषांमध्ये काही बदल करून अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल, यासाठी सुधारित प्रस्ताव तयार केला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
कर्जमाफीला वेग: राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता.
20 हजार कोटींची तरतूद: पुरवणी अर्थसंकल्पातून कर्जमाफीसाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सुधारित निकषांनुसार लाभार्थी निश्चित केले जात आहेत.
लाखो शेतकऱ्यांचे लक्ष: कर्जमाफीला झालेल्या विलंबानंतर आता लाखो शेतकऱ्यांचे लक्ष पहिल्या लाभार्थी यादीच्या घोषणेकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.