Love Jihad : 'पुण्यात लव्ह जिहादचा 'एफसी रोड पॅटर्न', 400 चा ड्रेस 200 ला अन्...'; गोपीचंद पडळकरांचा धक्कादायक दावा!

Gopichand Padalkar Love Jihad FC Road : 100 मुलींनाटार्गेट केलं जातं. त्यांच्या बिलाच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल क्रमांक गोळा केले जातात, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
BJP MLA Gopichand Padalkar claims Pune’s FC Road is witnessing a targeted ‘Love Jihad pattern’, sparking public debate.
BJP MLA Gopichand Padalkar claims Pune’s FC Road is witnessing a targeted ‘Love Jihad pattern’, sparking public debate.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्यातील राजकारण मराठीच्या मुद्द्यावरून तापल असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठीचा मुद्दा तापला असताना दुसरीकडे धर्मांतर आणि लव्ह जिहाच्या मुद्द्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत.

पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यामध्ये लव्ह जिहादचा 'एफसी रोड पॅटर्न' सुरू असल्याचं दावा केला आहे. एफसी रोडवरील मार्केटमध्ये लव जिहादच रॅकेट सुरू असल्याचा खळबळजनक दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी पुण्यातील एका धर्मांतर विरोधातील मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर संवाद साधताना गोपीचंद पडळकर म्हणाले, लोक म्हणतात लव्ह जिहाद होत नाही. मात्र काही मुलांनी मला सांगितलं की एफसी रोडला एक मुलींच्या कपड्याचे दुकानाच्या माध्यमातून लव्ह जिहाद सुरू आहे.

'इतर ठिकाणी 400 रुपयाला ड्रेस मिळत असेल तर त्या दुकानांमध्ये तो ड्रेस 200 रुपयाला मिळतो. त्यामुळे स्वस्त असल्याने आपल्या सगळ्या मुली त्यात दुकानांमध्येच खरेदी करायला जातात. शंभर मुली झाल्या की त्यांना टार्गेट केलं जातं. त्यांच्या बिलाच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल क्रमांक गोळा केले जातात. त्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून त्या मुलींना टार्गेट केलं जातं आणि त्यातील चार-पाच मुलींना लव जिहादच्या बळी पाडलं जातं.', असा दावा पडळकर यांनी केला.

BJP MLA Gopichand Padalkar claims Pune’s FC Road is witnessing a targeted ‘Love Jihad pattern’, sparking public debate.
Parliament Session: मोदी सरकारला जाब मागता-मागता विरोधकांचीच होणार दमछाक; सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचीही परीक्षा

हिंदू मुली बाटवण्यासाठी षडयंत्र...

'हे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे की या गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष घालावं.लव्ह जिहादचे प्रकार थांबले पाहिजेत त्यासाठी मुलीवर चांगले संस्कार केलेच पाहिजे. त्याचबरोबर तिचा मित्र कोण आहे? ती कोणाच्या संपर्कात आहेत. कोणाशी चॅटिंग करत आहे ?फेसबुकवर तिचे मित्र कोण आहेत. या सर्व गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. हिंदूंच्या मुली बाटवण्यासाठी षडयंत्र सुरू आहे.', असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

BJP MLA Gopichand Padalkar claims Pune’s FC Road is witnessing a targeted ‘Love Jihad pattern’, sparking public debate.
BJP Politics : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या ठाकरेंना दे धक्का! बालेकिल्ल्यात 'डॅमेज कंट्रोल', विकास म्हात्रेंचे मन वळवले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com