Gopichand Padalkar Vs Jayant Patil : 'जयंत पाटील लाचार, झुकत नाही पालथे पडले...', गोपीचंद पडळकर नको नको ते बोलले!

Gopichand Padalkar Jayant Patil BJP NCP sharad Pawar : गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली. ते दुसऱ्या पक्षात जाण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले.
MLA Gopichand Padalkar On Jayant Patil
MLA Gopichand Padalkar On Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Gopichand Padalkar News : जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राहण्याचे संकेत दिले आहेत. वाळवा तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगली जिल्हा, वाळवा तालुका झुकत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या जिव्हारी लागेल अशी भाषा वापरत टीका केली.

पडळकर म्हणाले, 'जयंत पाटलांची मानसिकता मला खचल्यासारखी दिसत आहे. त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की सांगली जिल्हा, वाळवा तालुका कधी झुकत नाही. हे बरोबर आहे. पण जयंत पाटील हा झुकत नाही पालथा पडतोय.'

'जयंत पाटील 20-30 वर्ष सत्तेत होते. करा ना लोकांच्यासाठी आंदोलन. लोकांसाठी सरकारच्या विरोधात बोला ना. जयतं पाटलांचं सभागृहातलं भाषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते सरकारच्या विरोधात बोलतोय की बाजुने बोलतायेत.', असा टोला देखील पडळकरांनी लगावला.

'सरकारच्या विरोधात बोलायला हिंमत लागते. त्याला काळीज लागतं. तुमची भूमिका मांडायला काळीज लागतं. हे रात्री 9, 10 नंतर दर्शन घ्यायचं, पालथं पडायचं आणि म्हणायचं मला पार्टीत घ्या आणि इकडे म्हणायचं वाळवा तालुका झुकत नाही. जयंतराव पाटील यांच्या सारखी विटंबन मी कोणाची पाहिली नाही.' असे देखील पडळकर म्हणाले.

MLA Gopichand Padalkar On Jayant Patil
Gokul Dairy Election 2026: 'गोकुळ'चे दूध 'तापणार'; आतापासून 'उकळी' फुटण्यास सुरवात

'इतकी वाताहत इतकी लाचारी आणि पार्टीत घ्या आणि मंत्री करा यासाठी येवढी लाचारी स्वीकारणं हे जयंत पाटलां येवढं कोणी केलं नसेल. ', असा टोचक टोलाही पडळकरांनी लगावला.

बॅलेटवर शरद पवारांचा पक्ष पराभूत

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरून गोपीचंद पडळकर यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचे उदाहरण देत म्हटले की, शरद पवारांचा पक्ष हा माळेगावच्या निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन पराभूत झाला. खरं तर निवडणुक आयोगावर शंका घेणं हे संविधानाच्या विरोधात आहे.

MLA Gopichand Padalkar On Jayant Patil
USA Tariff: भारतासारख्या मित्र राष्ट्रावर 'टॅरिफ बॉम्ब', पण चीनवर का नाही? ट्रम्प यांच्या टीमनं सांगितली इनसाईड स्टोरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com