Padalkar Brother Land Scam : गोपीचंद पडळकरांच्या भावाने हडपली 17 एकर जमीन? 82 वर्षाची आजी विधानभवनावर धडकल्या

17 Acres of Land Brahmanand Padalkar Gopichand Padalkar : विठाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कैलास वाघमारे याने आपली फसवणूक करत जमीन हडप केली. विठाबाईच्या कुटुंबीयांचे मते कैलास वाघमारे हे ब्रह्मानंद पडळकर यांच्यामार्फत जमीनीच्या व्यवहाराची कामे पाहतो.
kailash waghmare  Gopichand Padalkar
kailash waghmare Gopichand Padalkarsarkarnama
Published on
Updated on

Land Scam News : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाने आपली 17 एकर जमीन हडप केल्याचा आरोप 82 वर्षी विठाबाई पडळकर यांनी केले आहे. विठाबाई पडळकर हे गुरुवारी विधानभवानाच्या बाहेर आले होते. त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर फसवणूक करत जमीन हडपल्याचा आरोप केला आहे.

आजीच्या कुटुंबीयांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी सर्वांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी आपल्या जमिनीची कामे पाहणाऱ्या माणसाच्या मार्फत फसवणूक केल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी विठाबाई यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्यात दिली आहे.

विठाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कैलास वाघमारे याने आपली फसवणूक करत जमीन हडप केली. विठाबाईच्या कुटुंबीयांचे मते कैलास वाघमारे हे ब्रह्मानंद पडळकर यांच्यामार्फत जमीनीच्या व्यवहाराची कामे पाहतो. विठाबाई यांनी सांगितले की, त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांचे वय 82 असून त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांच्या संभाळ त्यांचे पुतणे करतात. आमच्या जमिनीचे वाटप झालेले नाही. ती जमीन पुतणे कसत होते. मात्र, ब्रह्मानंद पडळकर यांचे निकटवर्तीय कैलास वाघमारे यांनी फसवणूक करत जमीन आपल्या नावावर करून घेतली.

kailash waghmare  Gopichand Padalkar
Disha Salian case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लिन चिट मिळताच राऊतांचा CM फडणवीसांसह नितेश राणेंवर हल्लाबोल

पेन्शन सुरू करण्याचा बहाणा केला अन्...

विठाबाई यांचे नातू चैतन्य पडळकर यांनी सांगितले की, विठाबाई यांना कैलास वाघमारे आणि इतर जणांनी आजी तु्म्हाला पेन्शन सुरु करून देतो. तुम्हाला दरमहा १५०० रुपये मिळेल. त्यामुळे आजी त्यांच्यासोबत गेली. तेथे त्यांनी आजीना पेन्शन सुरू होणार आहे असे सांगून कागदपत्रांवर सह्या घेऊन जमीन नावावर केली.

गोपीचंद, ब्रह्मानंद यांचे निकटवर्तीय कैलास वाघमारे

चैतन्य वाघमारे यांनी आरोप करताना म्हटले की, जमिन कैलास वाघमारे यांच्या नावावर करून घेण्यात आली असली तरी ते गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचे निकटवर्तीय आहेत. ब्रह्मानंद पडळकर यांच्यासाठीच कैलास वाघमारे जमिनीचे व्यवहार करत असतो. त्यामुळे यामागे ब्रह्मानंद हेच आहेत. आमच्याकडे कैलास वाघमारे हे गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असलेले फोटो देखील आहेत. कैलास हे गोपीचंद आणि ब्रह्मानंद यांचा खास माणूस ओळखला जातो.

kailash waghmare  Gopichand Padalkar
Shiv Sena Politics : नारायण राणे कधीही विसरणार नाहीत असे हे दिवस; काय घडलं, काय घडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com