

Government employees pay hike news: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी महागाई भत्त्याबाबत (DA) पुन्हा एकदा आनंदाची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षीच्या दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्त्याच्या वाढीकडे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले असून, दिवाळीपूर्वी सरकारकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याआधी एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली. या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी तसेच जवळपास 65 लाख निवृत्तीवेतनधारकांना झाला. याचवेळी महागाई दिलासा (DR) देखील वाढवण्यात आला होता.
दरम्यान, विविध सरकारी संस्थांकडूनही महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने मे, जून आणि जुलै 2026 या कालावधीसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये वाढ जाहीर केली.
त्यानंतर भारतीय रेल्वेनेही आपल्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 2 टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून होणाऱ्या पुढील DA वाढीबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.
महागाई भत्ता निश्चित करताना ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स (AICPI-IW) या निर्देशांकाचा आधार घेतला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार मार्च 2026 मध्ये हा निर्देशांक 149.1, एप्रिलमध्ये 149.9 आणि मेमध्ये 150.8 इतका नोंदवण्यात आला आहे.
या वाढत्या निर्देशांकामुळे यावेळी DA मध्ये 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, जून 2026 च्या AICPI-IW निर्देशांकाची आकडेवारी आणि त्यानंतर केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच याबाबत अधिकृत निर्णय स्पष्ट होईल.
गेल्या काही वर्षांतील निर्णयांचा विचार केला तर केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षांतही दिवाळीपूर्वीच DA वाढ जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे यंदाही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून महागाई भत्ता वाढ जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.