
Bhaskar Jadhav News : राज्यपालांच्या अभिषानावर बोलताना भास्कर जाधव हे भाजप आमदार राम कदम यांच्यावर संतापाले. राम कदम हे भास्कर जाधव यांचे भाषण सुरू असताना वारंवार बोलत होते तेव्हा संतापून 'आता बघतोच तुला', असे जाधव यांनी म्हटले.
'राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वारंवार नाव घेतलं. वारंवार नको ते आरोप केले. आम्ही तुमच्यासमोर डोकं फोडून घ्यावं का? . सांगत होतो पाईंट ऑर्डर सभागृहामध्ये संसदीय कर्मचाऱ्याची बूज म्हणून घ्या', असे देखील भास्कर जाधव यांना तालिकाअध्यक्षांना उद्देशून म्हटले.
राम कदम यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. त्यावर जाधव यांनी आक्षेप घेतला. 'सभागृहाचा नियम आहे की ज्यावर आरोप करत आहोत तो सदस्य सभागृहात नसले तर त्याचे नाव घेता येत नाही. त्याला आरोपाचा खुलासा करता येत नाही. आम्ही वारंवार सांगितले मग आत्ता आम्ही काय करायला पाहिजे.', असे उद्विग्न सवाल भास्कर जाधव यांनी केला.
भास्कर जाधव म्हणाले की मला नवीन सदस्यांना विनंतीवजा सुचना करायची आहे. कधी कधी आपण आपल्या नेत्यांना आपली इतकी चापलूसी करतो. पण आपल्याला कळत नाही आपण त्या पक्षाची बदनामी करतोय.
तालिकअध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी जाधव यांना म्हटले की, राम कदम जे बोलले ते आपण रेकाॅर्डवरून काढून टाकू. त्यावर जाधव म्हणाले, माझी विनंती आहे की माझ्या नेत्यावर जे आरोप झाले ते काढू नका. कारण आपल्यानंतरची पीढी ते वाचेल आणि आपण किती आदर्श निर्माण केले याचा अभ्यास करतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.