Maharashtra Governor : मोदी सरकारचा निर्णय, राज्यपालांकडून गुजरातच्या ‘राजभवन’बाबत मोठी घोषणा; महाराष्ट्रही रांगेत

Gujarat Raj Bhavan renamed : राज्यपाल आचार्च देवव्रत यांनी गुजरात राजभवन आणि गुजरात लोकभवन म्हणून ओळखले जाईल, असे जाहीर केले आहे.
Acharya Devvrat Raj Bhavan name change
Acharya Devvrat Raj Bhavan name changeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Raj Bhavan update : इंग्रजांच्या पाऊलखुणा मिटविण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. इंग्रजांच्या काळात विविध राज्यांमध्ये नियुक्तीला असलेल्या गव्हर्नर्सच्या निवासस्थानांना त्यावेळी गव्हर्नर्स हाऊस म्हटले जात होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा उल्लेख राजभवन असा करण्यात येऊ लागला. आता हे नावही बदलण्यात आले आहे.

केंद्र सरकारने २५ नोव्हेंबर रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार देशातील राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखले जाणार आहेत. देशात याबाबतचा पहिला निर्णय घेणारे राज्य पश्चिम बंगाल ठरले आहे. या बदलाचे मुख्य कारण नागरिक आणि राज्यपालांमधील दुरावा कमी करणे, हा आहे. लोकभवन या नावामुळे लोकांना याविषयी आपुलकी वाटेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

यापार्श्वभूमीवर गुजरात व महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्च देवव्रत यांनी गुजरात राजभवन आणि गुजरात लोकभवन म्हणून ओळखले जाईल, असे जाहीर केले आहे. त्यांनी सोमवारी सोशल मीडियातून याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. मात्र, त्यामध्ये महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Acharya Devvrat Raj Bhavan name change
High Court News : हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिली 10 आठवड्यांची मुदत; महापालिका, ZP च्या निवडणुकांचे काय?

राज्यपालांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुजरात राजभवन आता गुजरात लोकभवन होईल. हे परिवर्तन केवळ नावामध्ये नसेल तर जनसेवेच्या भावनेला आत्मसात करण्याचा संकल्प आहे. लोकभवन म्हणजे जनता सर्वोपरि. आता हे भवन केवळ राज्यपालांचे निवासस्थान नाही, तर नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, संशोधक, सामाजिक संघटनांसोबत संवाद, सहकार्य आणि सहभागाचे एक जिवंत केंद्र बनेल.

Acharya Devvrat Raj Bhavan name change
Local Body Elections : मतमोजणी लांबणीवर! हायकोर्टाने नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली; आयोगाला जोरदार दणका

लोकभवनाचा उद्देश शासन आणि जनतेदरम्यान विश्वास, संवेदना आणि सेवेचा एक मजबूत पूल बांधण्याचा आहे. जनताच लोकभवनचा आत्मा आहे, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आतापर्यंत गुजरातसह तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, ओडिशा, त्रिपुरामध्ये हा बदल करण्यात आला आहे. तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशात नायब राज्यपालांचे राज निवासाचे नाव लोक निवास करण्यात आले आहे. इतर राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com