Imtiaz Jaleel-Sanjay Shirsat : हाॅटेल खरेदीतून माघारीने संजय शिरसाट बॅकफूटवर! इम्तियाज जलील यांची सरशी..

Sanjay Shirsat reportedly retreats from hotel purchase deal, sparking political buzz over Imtiaz Jaleel's rising influence in the region amid ongoing developments. : लिलावानूसार भरावी लागणारी 25 टक्के रक्कम न भरल्याने या हाॅटेल खरेदी प्रक्रियेतून संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचा अर्ज बाद झाला. त्यासाठी 20 लाखांचा भुर्दंडही त्यांना बसला.
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Aimim-Shivsena News : गेल्या महिनाभरापासून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पालकमंत्री संजय शिरसाट विरुद्ध एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. मंत्री पदाचा वापर आणि राजकीय दबावातून संजय शिरसाट यांनी बेकायदा मालमत्ता खेरदी केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. जाहीर पत्रकार परिषद घेत त्यांनी कागदोपत्री पुरावे सादर केले आणि प्रकरणाचा पिच्छाही पुरवला. परिणामी मंत्री संजय शिरसाट यांना हाॅटेल व्हि्टस खरेदी प्रक्रियेतून माघार घ्यावी लागली.

लिलावानूसार भरावी लागणारी 25 टक्के रक्कम न भरल्याने या हाॅटेल खरेदी प्रक्रियेतून संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचा अर्ज बाद झाला. त्यासाठी 20 लाखांचा भुर्दंडही त्यांना बसला. आरोपांची राळ उठवून कोंडी होत असल्याने या प्रकरणाला आणखी हवा नको, या हेतून संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. अखेर मुदतीत 25 टक्के रक्कम न भरल्याने सिद्धांत शिरसाट यांचा अर्ज आपोआप बाद झाला. इम्तियाज जलील-संजय शिरसाट यांच्या संघर्षात इम्तियाज यांची सरशी झाल्याची चर्चा यानंतर सुरू झाली आहे.

व्हिट्स हाॅटेल खरेदी प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत या व्यवहाराची चौकशी करून तो रोखण्याची मागणी केली होती. एकूणच हे हाॅटेल खरेदी प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिरसाट यांनी त्रागा करत यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. व्हिट्स लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचे जाहीर केल्यानंतर प्रकरण थंडावेल असा शिरसाट यांचा अंदाज होता. पण उलट त्यांच्या कुटुंबियांच्या नावे खरेदी केलेल्या इतर भूखंड, जमीनीची प्रकरण काढत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिरसाट यांची कोंडी केली.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना... हॉटेल व्हिट्सच्या खरेदी प्रक्रियेतील माघारही चांगलीच महागात पडणार!

ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेला शेंद्रा एमआयडीसीतील आरक्षित भूखंड आरक्षण बदलून मुले आणि पत्नीच्या नावे खरेदी केल्याचे कागदोपत्री पुरावे इम्तियाज जलील यांनी माध्यमांसमोर आणि नंतर लाचलूचपत विभाग, सीबीआयकडे सोपवले. सरकारी व खासगी जमीन, शहरात मोक्याच्या ठिकाणी प्लाॅट अशी एकापाठोपाठ एक प्रकरण बाहेर येऊ लागल्याने संजय शिरसाट बॅकफूटवर गेले. आरोपांना उत्तर न देता इम्तियाज जलील यांच्यावर अॅट्राॅसिटीचा गु्न्हा, समर्थकांनी घरावर जाऊन शेणफेक करण्याचा केलेला प्रयत्न आणि आता मोर्चाचे आयोजन यामुळे शिरसाट-इम्तियाज संघर्ष अधिकच चिघळला आहे.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat- Imtiaz Jaleel : इकडे फौजदारी दावा, तिकडे शिरसाटांच्या विरोधातील पुरावे घेऊन इम्तियाज जलील सीबीआयकडे!

संजय शिरसाट यांनी योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असे सांगत सध्या इम्तियाज जलील यांच्या विरोधातील आरोपांवर गप्प राहणे पसंत केले आहे. तर दुसरीकडे अॅट्राॅसिटी आणि मोर्चा काढत निर्माण केल्या जाणाऱ्या दबावापुढे न झुकता संजय शिरसाट यांच्यावर कारवाई आणि त्यांची चौकशी करावी यासाठी इम्तियाज जलील जोर लावताना दिसत आहेत. इम्तियाज जलील यांच्या विरोधात उद्या निघणाऱ्या मोर्चानंतर वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. एकीकडे इम्तियाज जलील यांना जातीवादी म्हणत आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एमआयएमने समाज माध्यमांवर मोहिम सुरू केली आहे.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat- Ambadas Danve : एमआयएमशी युतीचा दावा करणाऱ्या संजय शिरसाट यांना खैरे-दानवेंनी सुनावले!

विशेष म्हणजे इम्तियाज-शिरसाट संघर्षाकडे मित्रपक्ष आणि विरोधक सोयीनूसार पाहत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महायुतीतील भाजपकडून इम्तियाज जलील यांना रसद पुरवली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. सत्ताधारी महायुतीतील एका मंत्र्यावर विरोधक एमआयएमच्या माजी खासदाराकडून गंभीर आरोप होत असताना मित्रपक्ष असलेला भाजपच्या गोटातून कुठलीही प्रतिक्रिया किंवा शिरसाट यांचा बचाव करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निमित्ताने शिरसाट यांची कोंडी करताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com