Minister Gulabrao Patil
Minister Gulabrao Patil Sarkarnama

Gulabrao Patil On Harshal Patil Suicide : हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, मंत्री गुलाबराव पाटलांनी जाहीर केलं, 'एक रुपयाचंही बील...'

Gulabrao Patil Gulabrao Patil : सरकारला कसलेही भान राहिलेले नाही.शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
Published on

Gulabrao Patil News : जल जीवन मिशनचे काम करूनही तब्बल 1.40 लाख रुपयांचे थकीत बील न मिळाल्याने सांगलीतील युवा कंत्राटदार हर्षल पाटील याने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. हर्षलच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षांकडून सरकारला टार्गेट केले जात आहे. मात्र, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबात मोठी माहिती दिली आहे.

'जो आरोप केला जातो आहे की हर्षल पाटील यांच्या जल जीवन मिशनच्या कामाचे पैसे थकले होते त्यामध्ये तथ्य नाही. मी स्वतः याविषयी जिल्हा परिषदेच्या सीईओंशी आणि कार्यकारी अभियंत्याशी बोललो आहे. हर्षलला कोणतेही काम जिल्हा परिषदेकडून देण्यात आले नव्हते. तसेच त्यांचे कोणतेही बिल पेंडीग नाही. जर त्यांना सबलेट काम घेतले असेल तर त्याविषयी आम्हाला माहिती नाही.', असे गुलाबराव पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी ट्विट करत हर्षल पाटील याच्या मृत्यूसाठी सरकारला जबाबदार धरत म्हटले आहे की 'एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही.शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा.'

 Minister Gulabrao Patil
Next Vice President : 'बिहार'साठी सारा खेळ! धनखड यांच्या राजीनाम्यानंतर 'हा' मोठा नेता उपराष्ट्रपती होणार? केंद्रीय मंत्राने घेतली भेट

'सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले. राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे.', असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारकडे पैसेच नाहीत

लाडकी बहीण योजना एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये.एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला.राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला.दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं बिल अडवली गेली आहेत.कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकावर केला आहे.

 Minister Gulabrao Patil
Girish Mahajan Vs Khadse: IAS महिला अधिकाऱ्याशी संबंधांचा आरोप जिव्हारी; मंत्री महाजनांनी खडसेंना खेचलं थेट कोर्टात; पहिलं पाऊलही टाकलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com