Next Vice President : 'बिहार'साठी सारा खेळ! धनखड यांच्या राजीनाम्यानंतर 'हा' मोठा नेता उपराष्ट्रपती होणार? केंद्रीय मंत्राने घेतली भेट

Ram Nath Thakur J P nadda Jagdeep Dhankhar : रामनाथ ठाकूर यांची ज्यावेळी नड्डा यांनी भेट घेतली त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.
r J P nadda Jagdeep Dhankhar
r J P nadda Jagdeep Dhankharsarkarnama
Published on
Updated on

Next Vice President : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपति‍पदाचा अचनाक राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडसाठीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. नवीन राष्ट्रपती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील असतील अशी चर्चा सुरू होती.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव देखील या पदासाठी चर्चेत होते. मात्र, अचानक बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी बिहार राज्यातील मोठ्या नेत्याची भेट घेतली. त्यामुळे या नेत्याचे नाव उपराष्ट्रपतीच्या रेसमध्ये आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

जे पी नड्डा यांनी केंद्रीय कृषिराज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर हे नितीन कुमार यांच्या पक्षाचे सदस्य असून राज्यसभेचे खासदार आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. सामाजिक न्यायाच्या आंदोलनात कर्पुरी ठाकूर यांचे योगदान मोठे आहे. गेल्यावर्षी कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

रामनाथ ठाकूर यांची ज्यावेळी नड्डा यांनी भेट घेतली त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. त्यामुळे ठाकूर यांच्या नावावर उपराष्ट्रपति‍पदासाठी एकमत झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे रामनाथ ठाकूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील फेव्हरेट मंत्री असल्याचे सांगितले जाते. ठाकूर यांच्या नावासाठी नितीश कुमार यांचा देखील पाठींबा आहे.

r J P nadda Jagdeep Dhankhar
BJP Politics: संविधानिक पदावर विराजमान होण्यासाठी पात्रता असेलच असं नाही! भाजपचं राजकारण नेमकं काय खुणावतंय?

रामनाथ ठाकूर यांच्या नावाची चर्चा का?

रामनाथ ठाकूर हे अतिमागास प्रवर्गातून येतात. बिहारमध्ये या प्रवर्गाची संख्या अधिक आहे. रामनाथ ठाकूर यांचे वडील कर्पुरी ठाकूर हे मुख्यमंत्री असताना बिहारमध्ये अतिमागास प्रवर्गाला आरक्षण दिले. त्यामुळे रामनाथ ठाकूर यांच्या नियुक्तीने अतिमागास प्रवर्ग भाजप-नितीश कुमार यांच्या आघाडीकडे मोठ्या संख्येने वळेल असा अंदाज आहे.

रामनाथ ठाकूर यांचा राजकीय प्रवास

रामनाथ ठाकूर हे सुरुवातीच्या काळात लालू प्रसाद यादव यांच्यासोबत होते. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद देखील भूषवले आहे. मात्र, पुढे त्यांनी लालू यांची साथ सोडत नितीश कुमार यांचा हात धरला. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात ते 2005 मध्ये मंत्री होते. 2005 ते 2010 या काळात ते कॅबिनेट मंत्रिपदी होते. सध्या ते जेडीयूच्या कोट्यातून राज्यसभा खासदार आहेत. तसेच केंद्रीय कृषिराज्यमंत्री देखील आहेत.

r J P nadda Jagdeep Dhankhar
Nishikant Dubey Controversy : निशिकांत दुबेला मराठी खासदारांनी घेरलं, 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा देताच हात जोडले, संसदेच्या लाॅबीमधून काढला पळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com