Gunratna Sadavarte : वारंवार रखडणारा पगार,ST कर्मचाऱ्याची आत्महत्या; तरीही सदावर्ते म्हणाले,''शिंदे सरकार...''

Political News : काही मोजके अधिकारी शरद पवार यांच्या दावणीला बांधले गेले आहेत...
Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteSarkarnama
Published on
Updated on

Gunratna Sadavarte News : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढण्यास ठाकरे सरकारच जबाबदार आहे. आघाडी सरकारनं त्यांच्या कार्यकाळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणत्याही तरतुदी करून ठेवल्या नव्हत्या असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वासही व्यक्त केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सदावर्ते म्हणाले, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढण्यास ठाकरे सरकार जबाबदार आहे. आघाडी सरकारनं त्यांच्या कार्यकाळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील कोणत्याही तरतुदी करून ठेवल्या नव्हत्या. तसेच काही मोजके अधिकारी शरद पवार यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यांच्या कारभारामुळेच कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ते येणाऱ्या काळात आम्ही सिद्धही करू अशी खात्रीही गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी व्यक्त केली.

यावेळी सदावर्ते यांनी शिंदे-फडणवीस सरकार पगारही देईल, जुनी पेन्शनही देईल आणि सातवा वेतन लागू करील असा विश्वासही व्यक्त केला आहे. याचवेळी 124 कष्टकऱ्यांचे मृत्यू झाले होते. तेव्हा काँग्रेस आणि शरद पवार झोपले होते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. तुमच्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही लोकांचे जीव घेत आहात असा आरोपही सदावर्ते यांनी यावेळी केला आहे.

Gunratna Sadavarte
BJP नेत्याचा 'पराक्रम' ; तो VIDEO हायरल, नेटकरी संतप्त, 'महिला पोलिसासोबत ..

फेब्रुवारीचा अर्धा महिना उलटला तरी..

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वारंवार रखडत आहे. त्यामुळे उशिराने एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात पैसे येतात. आता राज्य सरकारने याबाबत एक जीआर काढला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आज पगार होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून 223 कोटी देण्यात आलेत. फेब्रुवारीचा अर्धा महिना उलटला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार झालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Gunratna Sadavarte
Ravikant Tupkar:''मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय,त्यांनी...''; तुरुंगातून बाहेर येताच तुपकरांचा शिंदेंवर घणाघात

वेळेवर पगार न झाल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा...

सांगली जिल्ह्यात एका एसटी कर्मचा-याने आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे खरं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. भीमराव सूर्यवंशी असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ते अधिक चौकशी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com