
New Delhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. त्यांच्या राज्यसभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापले असून काँग्रेसने राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शाह यांनी काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घालून संभ्रम निर्माण केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
शाह यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. ते म्हणाले, संविधानाला स्वीकारलेल्या घटनेला ७५ व्या वर्षानिमित्त संसदेत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेदरम्यान सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक मुद्द्यावर सदस्यांची, पक्षांची भूमिका वेगळी असते. पण संसदेत चर्चा होत असताना कोणतेही भाष्य तथ्यावर आधारीत असावी. कालपासून काँग्रेसने तथ्यांची मोडतोड करून मांडल्याने ते निंदनीय आहे, असे शाह म्हणाले.
भाजपच्या सदस्यांनी संविधाना आणि त्याच्या मुल्यांवर आणि जेव्हाजेव्हा भाजपच्या सत्तेच्या काळात भाजपने त्याचे कसे संरक्षण केले, यावर तथ्यांसह मांडणी केली. यामध्ये काँग्रेस आंबेडकरविरोधी, आरक्षणविरोधी, संविधानविरोधी पक्ष असल्याचे सिध्द झाले. काँग्रेसने सावकरांचाही अपमान केला. आणीबाणी आणून संविधानाचा अपमान केला. न्यायव्यवस्था, महिला, सैन्याचा अपमान केल्याचा निशाणा शाह यांनी साधला.
हे सत्य समोर आल्यानंतर काँग्रेसने कालपासून पुन्हा आपल्या जुन्या पध्दतीने काही गोष्टींची मोडतोड करून सत्याला असत्याची कपडे घालून मांडले. काँग्रेसने कशापध्दतीने आंबेडकरांचा विरोध केला हे सिध्द झाले. भाजपचा पाठिंबा असलेल्या सरकारने आंबेडकरांना भारतरत्न दिले. तोपर्यंत काँग्रेसचा त्याला विरोध होता. नेहरूंचा आंबेडकरांना असलेला विरोध जगजाहीर आहे, अशी टीका शहांनी केली. यावेळी शहांनी अनेक संदर्भही दिले.
राज्यसभेतील माझे विधानाची मोडतोड करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रसने केला. निवडणूक काळातही एआयचा वापर करून माझे विधान प्रसारित करण्यात आले. आज आंबेडकरांविषयीचे माझ्या विधानाबाबतही तेच केेले. माझे संपूर्ण भाषण जनतेसमोर ठेवावे. माझ्या पक्षाने कधीही आंबेडकरांचा अपमान केला नाही. आधी जनसंघ आणि आता भाजपने आंबेडकरांच्या सिध्दांतावरच चालले आहे. आरक्षणाला अधिक सक्षम करण्याचे काम भाजपने केले आहे, असेही शाह म्हणाले.
माझे संपूर्ण भाषण राज्यसभेच्या रेकॉर्डवर आहे. ज्यांनी आयुष्यभर आंबेडकरांचा अपमान केला ते लोक आज आंबेडकरांच्या नावावर संभ्रम निर्माण करत आहेत, असे सांगत शाह यांनी मल्लिकार्जून खर्गेंनाही आवाहन केले. ते म्हणाले, तुम्हीही राहुल गांधींच्या दबावाखाली यामध्ये सहभागी झालात. तुम्ही तरी असे करायला नको होते.
स्वप्नातही बाबासाहेबांचा अपमान करणार नाही, अशा पक्षात मी आहे. भाजपने चर्चेचा स्तर कायम ठेवण्याचा प्रयत्न आमच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केला होता. पण काँग्रेसने त्यावर पाणी फेरले. संपूर्ण देश काँग्रेसची ही मानसिकता ओळखत असल्याची टीका शाह यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.