Amit Shah : आंबेडकरांविषयी अमित शहांच्या कोणत्या विधानामुळे विरोधकांचा संताप? दिल्लीसह महाराष्ट्रतही पडसाद

Amit Shah Ambedkar remarks : अमित शाह यांच्या विधानावरून संसदेसह महाराष्ट्रातील विधिमंडळातही विरोधकांकडून जोरदार हंगामा करण्यात आला.
Amit Shah, Dr Babasaheb Ambedkar
Amit Shah, Dr Babasaheb AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: दिल्लीसह महाराष्ट्रातही बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक विधान कारणीभूत ठरले आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज सुरू होताच त्याचा जोरदार निषेध केला. संसदेच्या आवारातही आंदोलन करण्यात आले. तीच परिस्थिती महाराष्ट्रातही होती.

महाराष्ट्रात विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून शाह यांच्या विधानाचा मुद्दा विधानसभेसह विधान परिषदेतही उपस्थित करण्यात आला. विधानसभेत काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी शाह यांच्य विधानावरून जोरदार टीका करत चर्चेची मागणी केली. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. तर विधान परिषदेतही सर्व विरोधी आमदारांनी नारेबाजी केली.

Amit Shah, Dr Babasaheb Ambedkar
One Nation One Election : गैरहजर खासदार कोण? भाजपच्या नोटिशीनंतर कारणांची शोधाशोध, महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश...

विधान परिषदेत विरोधी आमदारांनी घोषणाबाजी करत शहांच्या विधानावर चर्चेची मागणी केली होती. पण उपसभापती नीलम गोऱ्हेंनी त्यावर आक्षेप घेत विरोधकांनाच खडेबोल सुनावले. पण तरीही विरोधक त्यावर ठाम होते. गोऱ्हेंनी त्याला न जुमनता सभागृहाचे कामकाज पुढे सुरूच ठेवले. त्यामुळे विरोधकांचा पारही चढला होता.

संसदेत विरोधकांनी अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच जय भीमचा नारा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढतच गेल्याने लोकसभेसह राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

Amit Shah, Dr Babasaheb Ambedkar
Parliament Winter Session : संसदेत घुमला 'जय भीम'चा नारा; भाजपचा काँग्रेसवर प्रहार, गोंधळामुळे कामकाज तहकूब

काय म्हणाले होते अमित शाह?

संविधानावर बोलत असताना अमित शाह आंबेडकरांविषयी म्हणाले होते की, आजकाल फॅशन झाली आहे, आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर. एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्गात स्थान मिळाले असते. चांगली गोष्ट आहे. आम्हाला आनंद आहे की, आता आंबेडकरांचे नाव घेत आहेत. त्यांचे नाव शंभरवेळा घ्या. पण त्यासोबत त्यांच्याप्रती तुमच्या भावना काय आहेत, हे मी सांगतो.

आंबेडकरांना पहिल्या कॅबिनेटमधून राजीनामा का द्यावा लागला?, असा सवाल करत शहांना यामागची कारणे सांगितले. ज्यांचा विरोध करता, त्यांचा मतांसाठी नाव घेणे किती योग्य आहे, अशी टीकाही शाह यांनी केली होती. शाह यांनी इतरही काही मुद्द्यांवर काँग्रेसवर निशाणा साधला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com