Maharashtra Political : खासदार राजाभाऊ वाजे यांनी संभाजीनगर सिपेटला जात घेतला प्रकल्पाच्या कामाचा आढावा

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Rajabhau Waje
Rajabhau WajeSarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Waje ; नाशिकला एज्युकेशन हब करण्याच्या अनुषंगाने आणखी एक पाऊल, खासदार राजाभाऊ वाजेंच्या प्रयत्नातून सिपेट साकारणार

नाशिकच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सिपेट CEPT (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग) प्रकल्प नाशिकमध्ये लवकरच सुरू व्हावा यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मागील एक वर्षभर जोरदार पाठपुरावा केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून खासदार वाजे यांनी नुकतीच संभाजीनगर येथील सिपेट संस्थेला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान खासदार वाजे यांनी सिपेटचे कामकाज कसे चालते, याबाबतची सविस्तर माहिती घेतली. सिपेट नाशिकमध्ये सुरू झाल्यावर नाशिकच्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कसा फायदा होईल, तसेच प्लास्टिक उत्पादन आणि संबंधित उद्योगांना याचा कसा लाभ मिळेल, याची त्यांनी पाहणी केली. सिपेट संस्थेचे प्रमुख आणि संचालक यांनी त्यांना प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

खासदार झाल्यापासून या प्रकल्पासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हा प्रकल्प नाशिकच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार असून हजारो तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. अशी प्रतिक्रियी खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

Aditya Thackeray on Dada Bhuse : शिक्षण मंत्र्यांना पहिलीत पाठवा, ते तिथेही 'नापास' होतील!

यंदा इयत्ता पहिलीला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा मौखिक असेल, पुस्तकं नसतील, पण मास्तर मुलांना तिसरी भाषा शिकवतील” अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. त्यावरुन आदित्य ठाकरे यांनी भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत ! आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास! हे सरकार चालवताएत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही 'नापास' होतील! अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर केली आहे.

Avinash Jadhav : 'याला' मराठी माणूस जाम चोपेल, मनसे नेत्याने सदावर्तेंना भरला दम

राज ठाकरे व उद्दव ठाकरे हे 5 जुलै रोजी मुंबईत हिंदीविरोधी आंदोलनात एकत्र येणार आहेत. वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी हे आंदोलन बेकायदेशी असून आमचा त्यास विरोध असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यावरुन मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे. आमची भाजपला विनंती आहे की, त्याच्या तोंडावर पट्टी बसवावी, सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतो, याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. याला मराठी माणूस जाम चोपेल असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली. एवढीच हिंमत असेल तर जा ना तिकडे साऊथमध्ये. तू स्वत:ला एवढा ज्ञानी समजतो ना मग तिकडं जाऊन विरोध करुन दाखव असं अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना आव्हान दिलं आहे.

Gunaratna Sadavarte on Raj Thackeray : ठाकरेंचा मोर्चा गल्लीतील निवडणुकीसाठी : सदावर्ते

राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन वादंग निर्माण झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी हिंदीविरोधी आंदोलनात एकत्र येणार आहेत. त्यावरुन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खोटे नरेटीव्ह पसरवत असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

त्यांनी राज ठाकरे यांची राज्यातील अवस्था हसण्यासारखी झाली आहे असं म्हटलं. ठाकरेंचा मोर्चा बेकायदेशीर आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, त्यांना मोर्चा काढता येणार नाही. त्याला आमचा विरोध आहे. हा गल्लीतील निवडणुकीसाठी मोर्चा असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com