
गुणरत्न सदावर्ते यांनी महायुती सरकारला थेट ओपन चॅलेंज दिलं आहे.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा त्यांनी आक्रमकपणे उपस्थित केला.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी त्यांनी या विषयावर चर्चा केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी तीव्र टीका केली आणि पोलिस खाते तुमच्याकडे आहे का? असा सवाल केला.
या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.
Mumbai News : मराठा समाजाला आरक्षणासाठी दुसऱ्यांदा आंदोलन करावे लागले. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा पाच दिवस आमरण उपोषण केले. यानंतर राज्यातील महायुती सरकारने यावर तोडगा काढत हे आंदोलन संपवले. यावेळी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा केली. हेच आंदोलन मागे घेताना जरांगे यांनी आणखी काही मागण्या सरकारकडून मान्य करून घेतल्या. ज्यात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुद्दाही होता. आता हा मुद्दा कळीचा बनला असून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट महायुती सरकारलाच ओपन चॅलेंज दिले आहे. त्यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच शब्द देणाऱ्या विखे पाटलांकडे पोलिस खाते देखील आहे का? असा सवाल करत त्यांनी गुन्हे मागे घेऊन दाखवावेच असे आव्हान दिले आहे. यामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
आज मुंबईत ओबीसींच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर त्यांची भेट सदावर्ते यांनी घेतली. याच भेटीनंतर त्यांनी सरकारला जरांगे यांच्या मागणीने काढलेल्या हैद्राबाद गॅझेटवरून घेरलं. तसेच ते गॅझेट कसा संविधानाविरोधात आहे, या बाबी महसूलमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या.
तसेच याच भेटीत त्यांनी बंजारा, धनगर कैकाडी, ओबीसीतील छोटे घटक यांना मराठा समाज कसा त्रास दिला जातोय याची माहिती दिल्याचेही सदावर्ते यांनी म्हटले. याच वेळी त्यांनी सरकारतर्फे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिलेल्या शब्दावरून टीका केली. तसेच त्यांनी, गुन्हे मागे घेतल्यास राधाकृष्ण विखे पाटलांना न्यायालयात बोलवू असाही इशारा दिला.
विखे पाटलांना इशारा देताना, विखे पाटलांनी मराठ्यांना शब्द दिला, पण त्यांच्याकडे पोलिस खाते देखील आहे का? असं आता वाटायला लागलं आहे. नुकसान झालेल्या गोष्टींचे गुन्हे मागे घ्यायला सांगितले आहे. मात्र शब्द देणारे राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही तिथे राहू शकता का? असा सवाल यावेळी सदावर्ते यांनी विखे-पाटलांना केलाय.
तर आता विखे-पाटील यांनी, तुम्ही गृहखातेही हातात घेतले की काय? उपोषण सोडतेवेळी समाज कल्याणचे मंत्री हे का नव्हते असा सवालही करताना ते कोठे होते आता असा प्रश्न पडत आहे. तर जरांगे पाटील यांच्यावर आरोप करताना, मनोज कसं आहे, स्वत:चे धंदे रेती टिप्परचे असतील रे बाबा.
पण, एकही प्रकरणात गुन्हे मागे घेवून दाखवून द्या, मग विखे पाटील यांनाच न्यायालयात बोलवण्याची विनंती करु. पाटील आहेत म्हणून सगळं लागू होत असं नाही. तुम्ही राधाकृष्ण आहात, असा इशारा देताना सदावर्ते यांनी गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयालाही विरोध केला आहे. त्यामुळे आता या ओपन चॅलेंजला सरकार आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील कसे उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.
1. सदावर्तेंनी महायुती सरकारला कोणते आव्हान दिले?
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आव्हान दिले.
2. ही भेट कोणासोबत झाली?
सदावर्ते यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
3. सदावर्तेंनी कोणावर टीका केली?
त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला.
4. या वक्तव्याने काय परिणाम झाला?
या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद उफाळला.
5. आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत सदावर्तेंची भूमिका काय आहे?
सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत, अन्यथा सरकारला ओपन चॅलेंज असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.