
गुणरत्न सदावर्ते यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत मराठा आरक्षण व ओबीसींचे प्रश्न मांडले.
त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आणलेल्या शासन निर्णयाला संविधानविरोधी म्हटले.
ओबीसींच्या लहान घटकांना सतत त्रास दिला जात असल्याचे सदावर्तेंचे मत.
या भेटीत हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा झाली.
सदावर्ते-बावनकुळे भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai News : राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठ्यांनी आंदोलन यशस्वी केल्यानंतर राज्य सरकारला हैद्राबाद गॅझेट लागू करण्यास भाग पाडले आहे. यानंतर आता राज्यातील बंजारा, धनगर, कैकाडी, ओबीसी समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर नेते हैद्राबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी करत आहेत. अशातच ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी, ओबीसींना एक भीती दाखवली जात असून प्रमाणपत्र आमच्या दमावर मिळवू अशी धमकी दिली जात असल्याचे म्हटलं आहे. त्यांचा रोख मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे होता. विशेष म्हणजे ओबीसींच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर सदावर्तेंनी बावनकुळे यांची भेट घेत हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षणावर चर्चा केली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
यावेळी सदावर्ते यांनी, राज्यातील बंजारा, धनगर, कैकाडी, ओबीसी या छोट्या समाजांना त्रास दिला जातोय. मराठा आंदोलना वेळी फक्त जरांगेंनी हट्ट केला म्हणून एक शासन निर्णय सरकारने काढला. पण तो संविधानाविरोधात कसा आहे, याची माहिती आपण महसूल मंत्री बावनकुळे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसींना सध्या एक भीती दाखवली जात असून प्रमाणपत्र आमच्या दमावर मिळवू असा दावा केला जात आहे. याचवेळी महसूल अधिकारी एका विशिष्ट समाजाच्या मनी पॉवरला घाबरत आहेत. त्यामुळे, ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचे गंडांतर येऊ नये म्हणून आपण बावनकुळे यांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरणही सदावर्ते यांनी यावेळी दिले आहे.
त्यावेळी बावनकुळे यांनी महसूलमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांना, जोपर्यंत फॅमिलीध्ये कुणबी दिसत नाही आणि कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत प्रमाणपत्र देऊ नका, असे आदेश दिल्याचे सांगितले. तर या आदेशामुळे महायुतीचे सरकार ओबीसींचे देखील असल्याचेही ते म्हणाले.
दोन राजकीय नापास लोक...
दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थवर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे बंधूंच्या कौटुंबीक भेटीनंतर ही पहिलीच राजकीय भेट होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा दोन तास चर्चा झाली. ज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे समोर येत आहे. या भेटीवर सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठाकरे बंधूंंना खोचक टोला लागवत, दोन राजकीय नापास लोक एकत्र आल्याने राजकीय यश मिळत नाही, असं म्हटलं आहे.
1. गुणरत्न सदावर्तेंनी काय म्हटले?
त्यांनी जरांगे पाटलांचा शासन निर्णय संविधानाविरोधी असल्याचा दावा केला.
2. ही भेट कोणाबरोबर झाली?
सदावर्ते यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
3. चर्चेत कोणते मुद्दे आले?
हैदराबाद गॅझेटियर, मराठा आरक्षण व ओबीसी समाजाचे प्रश्न.
4. राजकीय प्रतिक्रिया काय झाल्या?
या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले.
5. ओबीसी समाजाची भूमिका काय आहे?
ओबीसी समाज सतत होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.