Hasan Mushrif Vs Satej Patil : डॅमेज कंट्रोलसाठी सतेज पाटील सरसावले, मित्र हसन मुश्रिफांनी डिवचले, म्हणाले 'हळवे होऊ...'

Kolhapur Politic Hasan Mushrif Satej Patil Rahul Patil : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील हे राष्ट्रवादीत येणार आहेत. त्यावरून मुश्रिफांनी सतेज पाटलांना डिवचले आहे.
Satej Patil - Hasan Mushrif
Satej Patil - Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif News : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची राजकीय मैत्री सर्वश्रुत आहे. त्यातच मंत्री मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांच्या राजकीय भूमिकेला सुरुंग लावला आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा निष्ठावंत समजला जाणारा दिवंगत आमदार पीएन पाटील गट मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी डिवचले आहे.

राहुल पाटील यांचा पक्षप्रवेश होताच आमदार सतेज पाटील यांनी राधानगरी मधील काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र घेत बैठक घेत डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले. त्यावर मंत्री मुश्रीफ टोला लगावत म्हटले की, राज्यातील 10-20 माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश पाटील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत. त्यावर सतेज पाटील यांनी राधानगरीमधील कार्यकर्त्यांसमवेत फोटो काढल्याचे समजले. त्यांनी इतके हळवे होण्याची गरज नाही. उलट त्यांनी सहकार्य करावे'

शत्रू मित्रही बदलणार...

'जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील हे राष्ट्रवादीत येणार आहेत. या दोन्ही पाटील बंधूंच्या प्रवेशाने आम्हाला हत्तीचे बळ मिळणार आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत जिल्ह्यात विधानसभेचे तेरा मतदारसंघ होणार असल्याने शत्रू-मित्रही बदलणार आहेत.', असे देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Satej Patil - Hasan Mushrif
Rohini Khadse Meet Sharad Pawar : पती अटकेत, रोहिणी खडसे शरद पवारांना भेटल्या, नेमकी काय चर्चा?

विनय कोरे यांनी दमच दिला...

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मी राजीनामा देणार असल्याचे समजताच, आमदार विनय कोरे लंडनवरून थेट मुंबईत आले आणि असे केल्यास मैत्री तुटेल, असा दम दिला. संचालक मंडळाच्या बैठकीत बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा न देण्याचा ठराव केला, हा माझ्या दृष्टीने सुखद धक्का होता’, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Satej Patil - Hasan Mushrif
BJP Gujarati Card : ठाकरे बंधूंना मुंबईत रोखण्यासाठी गुजराती मतांचे एकीकरण, भाजपचा 'मास्टर प्लॅन'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com