Ambadas Danve News : औरंगजेबाचा द्वेष नक्कीच करा, पण इतर धर्माचा आदरही करा! अंबादास दानवेंचे आवाहन

Ambadas Danve calls for hatred towards Aurangzeb but urges respect for other religions, promoting religious harmony and tolerance. : कुराणमधील आयाती असलेली चादर जळल्यामुळे नागपूरात दंगल झाली असा, दावा विरोधकांनी केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा फेटाळला.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Shiv sena UBT : औरंगजेबाचा द्वेष नक्कीच करा पण इतर धर्माचा आदरही करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अजमेर शरीफ दरगाहला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ताजुद्दीन बाबाला चादर चालते. आणि हीच चादर नागपूर येथे पायदळी तुडवली जाते. कुराण आणि आयात असणाऱ्या चादरीचा आपण सन्मान करणे शिकले पाहिजे, असे आवाहन आणि उपदेश विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केला.

औरंगजेबाची (Aurangzeb) कबर आणि ती काढण्यासाठी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलन आणि नागपूरातील दंगलीवर विधीमंडळाच्या सभागृहात बरीच चर्चा झाली. कुराणमधील आयाती असलेली चादर जळल्यामुळे नागपूरात दंगल झाली असा, दावा विरोधकांनी केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा फेटाळला. त्यानंतर अजूनही सभागृहात या विषयावरून सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खडाजंगी सुरूच आहे. अंबादास दानवे यांनी याच मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.

याशिवाय जलसंधार, जलसंपदा, नगरविकास विभागा विषयीच्या अनेका विषयांना हात घालात आक्रमक भाषण केले. मागच्या काळात जलसंधारण आणि जलसंपदा विभाग एकत्र होते. सदरील विभागातील अधिकाऱ्यांना स्वतंत्र होण्यावेळेस विभाग निवडण्याची मुभा दिली होती. आज रोजी स्थिती बघितली तर जलसंधारण विभागातील अधिकारी जलसंपदा विभागात हस्तक्षेप करत आहेत. बेकायदेशीर हस्तक्षेप करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोखण्यात यावे, अशी मागणी (Ambadas Danve) दानवे यांनी केली.

Ambadas Danve News
Ambadas Danve News : 'छोटे मन से कोई बडा नहीं होता'.. वाजपेयींची कविता सादर करत अंबादास दानवेंची सरकारवर टीका

नगरविकास विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने UDCPR नियमाचे उल्लघन केल्याची तक्रार आली आहे. येथे नगररचनाकार पदावर ललित खोब्रागडे हे अधिकारी आहेत. कोणत्याही पडताळणीशिवाय त्याने RCC प्रदान केली आहे. सदरील प्रकरणी 100 ते 200 कोटींचे नुकसान झाले असल्याचा दावा करत याची चौकशी करा, अशी मागणीही दानवे यांनी केली.

Ambadas Danve News
Ambadas Danve On Aurangzeb : छत्रपतींचा आशीर्वाद घोषणा देत सत्तेवर आले, अन् शंभुराजांच्या मारेकऱ्याच्या कबरीला सरंक्षण देतायेत!

भारत-पाकिस्तान फाळणीवेळी आपला देश सोडून गेलेल्या लोकांची राहिलेली संपत्ती म्हणजे शत्रू संपत्ती होय. या संपत्ती संदर्भात एक वेगळेच प्रकरण समोर आले असून पाकिस्तान देशाच्या अधिकृत बॉण्डवर भारतात कारवाई करण्यात आली आहे. सदरील प्रकरणी कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही सभागृहात करण्यात आली.

Ambadas Danve News
Shivsena vs BJP : 2014 मध्ये युती तुटण्याचा 'खलनायक' कोण होते? उत्तर देत राऊतांची फडणवीसांना क्लिन चीट!

अहिल्यानगर जिल्ह्यात बऱ्हाणपूर नावाचे एक गाव असून येथे आई तुळजा भवानीचे मंदिर आहे. विधानसभा निवडणुकीत पुजारी अभिषेक भगत याने भारतीय जनता पक्षाच्याविरोधात इतर उमदेवारांचे काम केले असल्याने अंबिका भवन आणि तुळजा भवानी मंदिराचे प्रवेशद्वार पाडण्यात आले. आताचे सत्ताधारी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असले तरीही त्यांचे आमदार हिंदू देवी देवतांचा कशाप्रकारे अपमान करत आहे, याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com