
महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी पुण्यातील फरासखान पोलिस ठाण्यात भाजप पुणे शहर महामंत्री प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या विषयीची माहिती आमदार चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटवरून दिली आहे.
संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. नगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर संगमनेर शहराछटा विकासाचा वेग दुप्पट होईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या वतीने पंचायत समिती जवळील गुंजाळ नगर परिसरात ट्रक टर्मिनल उभारण्यात येत आहे. या टर्मिनलच्या कामाची पाहणी आमदार खताळ यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिला निकाल जाहीर झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलचे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील उमेदवार रतन भोसले हे विरोधी सहकार बचाव पॅनलचे उमेदवार बापूराव गायकवाड यांच्यापेक्षा 1427 मतांनी विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली. रतन कुमार भोसले यांना 8670 तर बापूराव गायकवाड यांना 7183 मते मिळाली.
उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे शिलेदार नितीन सरदेसाई हे आज (बुधवारी) एकत्र पत्रकार परिषद घेत आहेत.डिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांच्या अडचणीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद होणार आहे.
धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. शहरतील सिल्लोड रोडवर मंगळवार (24 जून) मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडलीय. हा अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजमी पहिली फेरी मंगवारवारी रात्री पूर्ण झाली. तर, दुसऱ्या फेरीची मतमोजणी आज (बुधवार) सकाळी पहाटे पाचपासून सुरू झाली आहे. दुपारी 12 च्या दरम्यान निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या फेरीत अजित पवारांचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. तर, रंजन तावरे यांचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.