Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासाठी पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार; मुंबईसह संपूर्ण राज्याला पावसाचा तडाखा

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर..
Flood in Godawari river
Flood in Godawari riverSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रासाठी पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार; मुंबईसह संपूर्ण राज्याला पावसाचा तडाखा

महाराष्ट्रात रविवारी हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2025 अंतर्गत राज्य सरकारकडून मोठी घोषणा

राज्य सरकारकडून महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2025 अंतर्गत मोठी घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांकडून अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याच्या उद्देशानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी अपडेट; विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक

नागपूर पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीने शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. नागपूरच्या शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना शुक्रवारी अटक केली आहे.  

'मुंबईची निवडणूक बॅलेटपेपरवर घेऊन दाखवा..'; उद्धव ठाकरेंच्या नेत्याचं महायुतीला चॅलेंज  

विधानसभा ज्या पद्धतीने तुम्ही जिंकला, त्यावरून तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर छी थू झाली. कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या निवडणुका हायजॅक केल्या, जिंकल्या ते दिसलं. पण महापालिकेत तुम्ही तेच करू इच्छित आहात. पण मुंबईतला समस्त मुंबईकर आणि मराठी माणूस तुमचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असेही उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठणकावलं आहे. तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेटपेपरवर घेऊन दाखवा, असं चॅलेंज राऊतांनी सरकारला दिलं आहे.

India-Pakistan : सिंधूचे पाणी पाकिस्तानला नाहीच! परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केली करारबद्दलची भूमिका.. 

भारताने सिंधू जल करार रद्द केला होता. यानंतर पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे. याबाबत आता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताने घेतलेला निर्णय हा पाकिस्तानने मैत्री आणि सद्भावना यासह कराराच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा नैसर्गिक परिणाम असल्याचे मिस्री म्हणाले.  

MNS News : माध्यमातून एकत्र येण्याच्या चर्चा करणाऱ्या संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या घरी काॅफी प्यायला यावे..

संजय राऊत यांनी माध्यमामधून न बोलता, ज्या प्रमाणे इतर नेते राज ठाकरे यांच्या घरी येऊन कॉफी पितात, त्यांच्याशी बोलतात, तसंच संजय राऊत यांनी देखील कॉफी प्ययाला यावे, त्यांची गाडी कोणी फोडणार नाही याची जबाबदारी मी घेईल, असा खोचक टोला मनसेचे प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांना लगावला.

Devendra Fadnavis : शंभर दिवसांच्या सुशासन कार्यक्रमानंतर आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम

महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र 2047 असे व्हीजन तीन टप्प्यात तयार करीत आहे. 100 दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना आणि उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम आमच्या सरकारने हाती घेतला. यात विविध विभागांनी 700 हून अधिक उद्दिष्ट साध्य केले. आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 2047 साठी दीर्घकालीन, महाराष्ट्र आपला अमृत महोत्सव साजरा करेल, त्या कालावधीचे म्हणजे 2035 साठी आणि प्रतिवर्षाच्या उद्दिष्टांसह 2029 साठीचे अल्पकालिक 5 वर्षांचे असे व्हीजन तयार करण्यात येत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. मी शिवसेनेत पंचवीस वर्ष होतो, राज आणि उद्धव ठाकरे यांना फार जवळून पाहिले आहे, असे सांगत त्यांना या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली.

Chhagan Bhujbal : माझे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रेम, छगन भुजबळांनी खरी शिवसेना कोणाची? हे सांगितलेच नाही..

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना खरी शिवसेना कोणाची? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर माझे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रेम असल्याचे सांगत हा प्रश्न टोलवला. मी एका शिवसेनेबरोबर सत्तेत आहे. एकनाथ शिंदे हे ही आमची शिवसेना बाळासाहेबांची असल्याचे सांगतात, असे भुजबळ म्हणाले.

PM Modi : केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियाप्रमाणे काम करावे..

केंद्र आणि सर्व राज्यांनी एकत्र मिळून टीम इंडिया प्रमाणे काम केले तर काहीच अशक्य नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निती आयोगाच्या बैठकीत सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साद घातली. भारताला विकासाचा वेग वाढवावा लागेल, एकत्र काम केले तर ध्येय अशक्य नाही, असेही मोदी म्हणाले.

Chhagan Bhujbal On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना क्लिनचीट मिळाल्यास, मी राजीनामा देईल; छगन भुजबळांच्या विधानानं मोठी खळबळ

Sandeep Gaikar
Sandeep GaikarSarkarnama

राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेले छगन भुजबळांनी एक मोठं विधान केलं आहे. धनंजय मुंडे यांना यांना क्लिनचीट मिळाल्यास, मी राजीनामा देईन, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो असंही छगन भुजबळ म्हणाले.

Sandeep Gaikar : शहीद संदीप गायकरांच्या पत्नीचा नवऱ्याला अखेरचा 'सॅल्युट'

अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र मराठा बटालियनमधील शूर जवान संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना वीरमरण आले. आज शनिवारी ब्राह्मणवाडा गावात शहीद संदीप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. या वेळी त्यांना शेवटची मानवंदना देण्यासाठी गावकऱ्यांसह परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. तर शहीद संदीप गायकरांना त्यांच्या पत्नीने आपल्या दीड वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन अखेरचा 'सॅल्युट' दिला. यावेळी हजारो नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे पाहायला मिळाले.

Rohini Khadase : वकिलांनी हगवणेंची केस घेऊ नये; रोहिणी खडसे यांचं आवाहन

वैष्णवी कास्पटे आत्महत्या प्रकरण अत्यंत अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. माझ्या वकील मित्र मैत्रिणींनो, या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका, अशी मी एक वकील म्हणून आपल्याला विनंती करेल, असे पत्रच रोहिणी खडसेंनी जारी केलं आहे.

Beed Crime : बीड पवनचक्की प्रकल्पातील गोळीबार प्रकरण; मयत राजू काळे अटल गुन्हेगार

बीडच्या लिंबागणेश परिसरातील महाजन वाडी इथं पवनचक्की प्रकल्पात चोरांवर केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेला राजू काळे ऊर्फ पाटील चीचा याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली. राजू काळे विरोधात 18 गुन्हे दाखल आहेत. राजू काळे हा त्याच्या साथीदारासह चोरीसाठी आला होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात राजू काळे जखमी झाला होता.

Beed Crime Update : बीड जिल्ह्यातून धक्कादायक माहिती; 174 विवाहितेंचा सासरी छळ

खून, दरोडा, खंडणी या प्रकरणात राज्यात अव्वल असलेल्या बीड जिल्ह्यात आता विवाहित महिला देखील सुरक्षित नाहीत. यंदाच्या वर्षी म्हणजेच जानेवारी महिन्यापासून तर आतपर्यंत तब्बल 174 महिलांचा सासरी छळ झाल्याचे शासन दफ्तरी नोंद झाली आहे.

Neelam Gorhe : महिला आयोगाने 'हे' करायला हवं होते

राज्य महिला आयोगाने जसं पोलिसांना सांगितले तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आतापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. पोलिसांनी केलं नाही हे ब्लेम गेम पेक्षा पीडित महिलांची कायदा साक्षरता वाढवणे सगळ्यांनी मिळून वाढवणं गरजेचं आहे. मीडिया, आम्ही, महिला संघटना सगळे आलो, सगळ्यांनी या महिलांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Anjlai Damaniya : खळबळजनक माहिती येणार समोर

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता वैष्णवीचा पती, दीर, सासू-सासरा तसेच नणंद यांना अटक करण्यात आली आहे. 51 तोळे सोने फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यानंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ काही थांबवला नाही. याच त्रासातून नंतर तिने स्वत:ला संपवलं. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेत लक्ष घातले असून लवकरच या प्रकरणात मी एक मोठा खुलासा करणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Karuna Sharma : चाकणकर यांना बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्ज

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्याप्रकरणात राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयोगाच्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे. रोहिणी खडसे यांनी तर अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्ज केला आहे. तर या वादात आता करुणा शर्मा-मुंडे या पण हिरारीने उतरल्या आहेत. त्यांनी महिला आयोगाच्या कारभारावर तुफान हल्लाबोल चढवला. चाकणकर यांच्या चिल्लर या प्रतिक्रियेचा त्यांनी खरमरीत समाचार घेतला.

Team India Test Squad : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड 

आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा झाली आहे.या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असेल.

Rohini Khadse : रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी 

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.

BJP : धर्मराव बाबा आत्रामांचा आरोप भाजपने फेटाळला

गडचिरोलीमध्ये माझ्या विरोधात महायुतीच्या नेत्यांनी काम केले. बंडखोरांना उभे केले. त्यांना आर्थिक मदत केली असा खळबळजनक आरोप माजी वनमंत्री तसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केल्याने महायतीमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले.

आमदार संदीप क्षीरसागरांकडून अजित पवारांचे आभार व्यक्त करणारे बॅनर

उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांचे आभार मानणारे बॅनर लावले आहे. पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन बैठकीत संदीप क्षीरसागर यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या अजितदादांनी पूर्ण केल्या. त्यामुळे क्षीरसागर यांनी बॅनर लावत अजितदादांचे आभार मानले. मात्र हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांना मिळाला सातपुडा बंगला

नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला मिळाला आहे. धनंजय मुंडें यांच्या खात्यानंतर त्यांचे दालन आणि आता त्यांचा बंगला देखील भुजबळांना यांना मिळाला आहे.

निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांचा छापा

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे बाळ तिच्या आई वडिलांकडे देण्यास नकार देणाऱ्या तसेच बंदूकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाला आहे. निलेश चव्हाण हा फरार असून त्याच्या कर्वेनगरमधील घरी पोलिसांनी छापा टाकला आहे.

पुण्याच्या खराडीत बनावट कॉल सेंटर पोलिसांचा छापा

पुण्यातील खराडीमधील बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या छापा टाकला. तब्बल 150 ते 200 पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊनही कारवाई करण्यात आली.अमेरिकेमधील लोकांना फसून डिजिटल अटक करत त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. यातील मुख्य आरोपी हा गुजरात असल्याचे देखील समोर आले आहे.

ऑपरेशन सिंदूरसाठी शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना

ऑपरेशन सिंदूरसाठी शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना झाले. शशी थरूर यांनी 'एक्स' (माजी ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले, "आम्ही जगाला दाखवू की भारत दहशतवादापासून घाबरत नाही. आम्ही शांत बसणार नाही आणि सत्य बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही. हा मिशन शांतीचा आहे. या मिशनद्वारे आम्ही जगाला हे पटवून देऊ की भारत शांतीच्या मार्गावर चालत आहे आणि दहशतवादाचा तीव्र निषेध करतो."

निलेश चव्हाणला अटक होणार

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे बाळ तिच्या आई वडिलांकडे देण्यास नकार देणाऱ्या तसेच त्यांना बंदूकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची दोन पथके त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी त्याला अटक होणार आहे.

Vaishnavi Hagawane : वैष्णवीला लग्नात दिलेले 51 तोळे सोने बँकेत गहाण

वैष्णवीला लग्नात दिलेले 51 तोळे सोने हगवणे कुटुंबियांनी फेडरेल बँकेत गहाण ठेवल्याची माहिती समोर आल आहे. वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिला हुंड्यात 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी दिली होती. हेच सोनं बँकेत गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज जुन्नर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. तसंच श्रीक्षेत्र ओतूर येथे आयोजित जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आणि सदैव वैकुंठ गमन सांगता सोहळ्यालाही ते आज उपस्थिती लावणार आहेत.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी आदिवासी विकास विभागाच्या निधीला कात्री

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे सरकारकडून आता विविध विभागाच्या निधीला कात्री लावण्याचा धडाका सुरू आहे. अशातच आता लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

Sindhudurg Rain Updates: कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढल्यामुळे कोकण किनारपट्टीवर हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे.

Vaishnavi Hagawane : पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई करु

वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तिच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या सासरच्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी राज्यभरातून मागणी केली जात आहे. वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दीराला सात दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात पोलिसांनी काही हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई कली जाईल असं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com