
अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (25, रा. हिंजवडी) या आयटीतील इंजिनिअर तरुणाने आत्महत्या केली. अभिलाषा ही हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत जाॅब करत होता. द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. या सोसाटीच्या 21 व्या मजल्यावर लिफ्टने गेला अन् तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली.
अमरावती तुरंगात असलेले नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 550 कोटी रुपये जालिंदर सुपेकर यांनी मागितल्याचा आरोप ॲड. निवृत्ती कराड यांनी केला आहे. तसेच गायकवाड यांचे बँक लॉकर्स, सोनं आणि रोख रक्कम जप्त करताना सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 100 ते 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील अॅड.कराड यांनी केला आहे.
मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. आता सरकारकडून मदतीचे वाटप सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 4. 23 कोटी केले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे जमा केले जाणार अवकाळीचा फटका तब्बल 7 हजार 661 शेतकऱ्यांना बसला आहे.
धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या प्रकरणाची दखल घेत लाचलुचपत विभागाने (एससीबी) 24 तासांत पुरावे देण्याचे अल्मिमेटम दमानिया यांना दिले आहे. पुरावे दिले नाही तर हे प्रकरण निकालात कगाढू, असे दमानिया यांनी एसीबीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दमानिय यांनी आपल्याकडे पुरावे आहेत असे त्यांनी सांगितले असून त्या पुरावे सादर करणार आहेत.
आयपीएल विजेता संघ बंगळुरुच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तब्बल 11 लोकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. यावरून कर्नाटक सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावरून कर्नाटकचे मुख्यंत्री सिद्धरामय्या यांनी कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन 50 ते 60 लोकांचा मृत्यू झाला होता, असे वक्तव्य केले.
महायुती सरकार म्हणजे तीन पक्षांचा तमाशा असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र 'सामना'च्या आग्रलेखातून केला आहे. नाराजीवर कुठलेही औषधे नाही. फडणवीस सरकारमध्ये नाराजीनाट्याचा तमाशा सुरू आहे त्यावरून मंत्रिमंडळात भडकू नये म्हणजे झाले, असे देखील आग्रलेखात म्हटले आहे.
नाशिकच्या इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या समृद्ध महामार्गाच्या शेवटच्या 76 किलोमीटर टप्प्याचे उद्घाटन आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या महामार्गामुळे मुंबईतून नाशिक प्रवास हा अवघ्या अडीच तासांत करता येणार आहे. समृद्धी महामार्ग हा तब्बल 10 जिल्ह्यातून जातो. नागपूर आणि मुंबई अशा दोन महागनगरांना जोडणार हा महामार्ग आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.