Hindu girl Muslim youth marriage : लग्नाच्या बोहल्यावरच थरार! तितक्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोहोचले; अन् अरमान शेखचा...

After Hindu activists exposed an alleged marriage attempt between a Hindu girl and a Muslim youth, Dombivli police in Mumbai registered a case against Armaan Shaikh : हिंदू युवतीशी मुस्लिम युवक लग्न करत असतानाच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
Hindu girl Muslim youth marriage
Hindu girl Muslim youth marriageSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Dombivli crime news : हिंदू युवतीशी मुस्लिम युवक करत असलेला लग्न, हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना लागलेली भनक, यानंतर उडालेल्या गोंधळामुळे मुंबई शेजारील डोंबिवली हादरली आहे.

युवतीच्या फिर्यादीवरून डोंबिवलीमधील शांतीनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. अरमान शेखविरोधात पाॅस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिंदू (Hindu) पीडित युवती ही अल्पवयीन आहे. सोशल मीडियाद्वारे अरमान शेख याने तिच्याशी मैत्री केली. तसा अरमान शेख व्यवसायाने टेलरिंग काम करतो. यानंतर जवळपास तीन वर्षे अरमान याने युवतीशी प्रेमसंबंध ठेवले. मुलीचे 18 वर्षे होताच, लग्न करण्याचे ठरवले होते.

ही हिंदू युवती सर्वसाधारण कुटुंबातली आहे. वाणिज्य शाखेतून प्रथम वर्षाचं शिक्षण घेतं. ही युवती भिवंडी इथं गेली होती. अरमान शेख याच्याशी ती लग्न करणार होती. तशी अरमान याने मुस्लिम (Muslim) पद्धतीने लग्न करण्याची तयारी केली होती. यासाठी काझी अन् साक्षीदार देखील बोलावले होते.

Hindu girl Muslim youth marriage
Sagar Moholkar : कुख्यात पैलवान मोहोळकरची ‘राक्षसी ताकद’ की फक्त मिथक? तोंडातून गोळी काढल्याची चर्चा पुन्हा रंगली

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप

अरमान शेख हिंदू युवतीशी लग्न करत असल्याची भनक हिंदू कार्यकर्त्यांना होती. तसं लक्ष ठेवून होते. अरमान शेख युवतीशी लग्न करत असतानाच, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लग्नात हस्तक्षेप केला. यानंतर लग्नात प्रचंड गोंधळ झाला. अरमान शेख याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

Hindu girl Muslim youth marriage
Radhakrishna Vikhe constituency crime : ‘टेंडर’वरून थेट पिस्तुल! मंत्री विखेंच्या मतदारसंघात समर्थक नगरसेवकाला धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

अरमान शेख याचं प्रेमजाळं

भिंवडीमधील शांतीनगर पोलिस ठाण्यात प्रकरण पोहोचले. परंतु डोंबिवलीमधील प्रकरण असल्याने शांतीनगर पोलिसांनी या दोघांना डोंबिवलीमधील विष्णूनगर पोलिस ठाण्यात पाठवले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते देखील त्यांच्याबरोबर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यानंतर अरमान शेख याने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात कसे अडकवले याचा घटनाक्रम समोर आला.

हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक...

दरम्यान, हिंदू युवतीला फूस लावून मुस्लिम युवक लग्न करत आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले, याची माहिती डोंबिवली अन् भिंवडीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यानंतर पोलिस ठाण्याबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यातून मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

पाॅस्को कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद

विष्णूनगर पोलिसांनी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून अरमान शेख या युवकाबरोबर वेठीस धरून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून, शारीरिक अत्याचार केल्याचा पाॅस्को कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद घेतली. अरमान शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com