
Indrajeet Sawant News : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि शिवीगाळ केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. ब्राह्मण समाजाबद्दल द्वेष पसरवत असल्याच्या आरोप करत प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीकडून त्यांना सोशल मिडिया आणि फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.सावंत यांनी धमकीचे कॉल रेकॉर्डिंग त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरूनही पोस्ट केले. या प्रकरणानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पण त्याचवेळी प्रशांत कोरटकरने हे आरोप फेटाळले आहेत. माझा आवाज मॉर्फ करून वापरण्यात आला असून मला बदनाम करण्याचे षडयंत्र इंद्रजीत सावंत यांनी रचले आहे. मी याबाबत रीतसर तक्रार करणार आहे. या आधीही अनेक वेळा माझे सोशल मीडियावर अकांऊट हँक झाले आहे. माझा या कॉलशी दूर दूर पर्यंत संबंध नाही, असे कोरटकरने सांगितले होते.
मात्र हे स्पष्टीकरण देत असताना इंद्रजीत सावंत यांच्याबाबत समाज माध्यमांवरील पोस्ट डिलीट केली आहे. इंस्टाग्रामवरील 'pm_koratkar' या अकाउंटवरून सावंत यांच्या एका मुलाखतीतील व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. पोस्ट करताना कोरटकरने सावंत यांना धमकी दिली होती. ब्राह्मणांबद्दल एक शब्द जरी काढला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) राहणे मुश्किल करेल" अशा आशयाची धमकी दिली होती.
पण आता ही पोस्ट कोरटकरने डिलिट केली आहे. मात्र सावंत यांनी धमकीचे कॉल रेकॉर्ड पोस्ट केले आहे. यातही प्रशांत कोरटकर हाच बोलत असल्याचे सांगितले जात आहे. सरकरानामाने या कॉल रेकॉर्डिंगची खात्री केलेली नाही. पण यात "जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा. शिवाय सावंत यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत घरात येऊन मारण्याची दिली धमकी देण्यात आली आहे.
या धमकीबद्दल पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. यावर काय कारवाई होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.