Indrajit Sawant threat : इंद्रजीत सावंतांकडून फडणवीसांना साकडे; म्हणाले, कारवाई करून आपण सर्व समाजाचे..!

Maharashtra CM devendra Fadnavis Political News : प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने आपल्याला धमकी दिल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केली आहे.
Devendra Fadnavis, Indrajit Sawant
Devendra Fadnavis, Indrajit SawantSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यांच्या नावाने धमकी आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप सावंत यांच्यावर करत त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी संबंधित इसमाने फोनद्वारे दिली आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील याचा निषेध केला आहे.

गृह विभागाने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणाले, साधारण 12 वाजता मला धमकीचा फोन आला. ती व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख त्या व्यक्तीने केला आहे. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत सावंत यांनी व्यक्त केली.

Devendra Fadnavis, Indrajit Sawant
Prashant Koratkar : "इंद्रजीत सावंतांना मी धमकी दिली नाही पण त्यांनी..."; प्रशांत कोरटकरांनी सर्व आरोप फेटाळले, नेमकं काय म्हणाले?

राज्याच्या गृह मंत्रालयाने यावर कारवाई करावी. त्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील, अशी आशा आहे. संबधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर ऊठबस आहे. पण अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे, माझे नातेवाईक, सहकारी सक्षम असल्याचे सावंत यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मी कसा बदलू. इतिहासाचे दाखले ब्रिटिश काळापासून आहे. खोटा इतिहास, घाणेरडा इतिहास सांगावा अशी त्यांची इच्छा आहे. पण खोटा इतिहास आम्ही का सांगू, त्या त्यावेळी ते मुद्दे खोडून काढले असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Devendra Fadnavis, Indrajit Sawant
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंच्या 'मर्सिडीज' वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतच नाराजी

आता आपण हा कॉल केला नसल्याचे सांगितले जात असले तरी, समाज माध्यमांवर त्याचे पुरावे देखील उपलब्ध असल्याचे इंद्रजीत सावंत यांनी नमूद केले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे समजते. त्यामुळे सावंत यांना नेमका कुणी फोन केला, हे लवकरच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com