

Ujjwal Nikam Speaks on Pump Storage Project: रायगडच्या कर्जमधील सायडोंगर परिसरात पंप स्टोरेज वीज प्रकल्पाच्या कामासाठी सुमारे ४०००० हजार वृक्ष तोडली जाणार आहेत. यावरुन राज्यात वादंग निर्माण झालं आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि नागरिकांनी याला कडाडून विरोध केला आहे. तर केंद्रीय पर्यावरण खात्याकडून याच्या संपूर्ण आवश्यक परवानग्या घेतल्यानंतरच वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांनी या प्रकल्पाचं समर्थनार्थ थेट या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंटच सांगितली आहे.
ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट करताना उज्ज्वल निकम सांगतात, कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे सांगताना निकम लिहितात. हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच वापली जाणार आहे. यातून 12,000 मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळेल. 30,000 कोटींची गुंतवणूक यातून येणार आहे. हा कोळशावर आधारित प्रकल्प नाही तर सौर ऊर्जे आधारित आहे, त्यामुळं पर्यावरणाला नुकसान करणारा नाही तर पर्यावरणाला पूरक प्रकल्प आहे.
पंप स्टोरेज प्रकल्प असल्यानं याचे स्थान निश्चित असते, तो अन्यत्र करता येत नाही. या प्रकल्पाला 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने पर्यायी वृक्षारोपणसाठी कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. त्यानंतरच वन विभागाने या प्रलल्पाला परवानगी दिली आहे. शिवाय परवानगीसाठी 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी संपूर्ण पर्यावरणीय अभ्यासानंतर प्राप्त झाल्या आहेत.
हा प्रकल्प सैदोनगर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किमी दूर आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको-सेन्सिटिव्ह झोनच्या (ESZ) बाहेर आहेत. त्यामुळं अभयारण्यातील कोणतीही झाडं तोडण्याचं काम चालू नाही. हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किमी दूर आहे. मंदिराजवळ कोणत्याही प्रकल्पाचं काम प्रस्तावित नाही.
या प्रकल्पामुळे पीक अवर्समध्ये स्वच्छ वीज मिळेल. इतकी वीज तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळले जाणार आहे. वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके कार्बन उत्सर्जन होते, तितके या प्रकल्पाने टळणार आहे. याच प्रकल्प क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 झाडे लावणार असून वन विभाग 30,000 झाडे लावणार आहेत. या प्रकल्पामुळं पाणी आणि जमीन वाचवली जाणार आहे. यामध्ये वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटर, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे आहे ते यात वाचवण्यात आले आहे. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पात वर्षाला सुमारे 1.6 दशलक्ष टन फ्लाय अॅश आणि 40-50 हेक्टर नवीन ओपन-कास्ट मायनिंग होते. ते या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे टाळले गेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.