Pune MLC Election: "2004 पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर..."; शिक्षक मतपेटीत मतदारानं टाकली चिठ्ठी; उमेदवारांना दिला इशारा

Pune MLC Election: राज्यातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी होत आहे. पुणे विभागातील दोन जागांसाठी बालेवाडी स्टेडियम इथं मतमोजणी सुरु आहे.
Pune MLC Election: "2004 पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर..."; शिक्षक मतपेटीत मतदारानं टाकली चिठ्ठी; उमेदवारांना दिला इशारा
Published on: 
Updated on: 

Pune MLC Election: पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी स्टेडयम इथं सुरु आहे. सकाळी ८ वाजता इथं मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी मतपेट्यांमधील मतपत्रिका बाहेर काढण्याचं काम सुरु असताना त्यात एक चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीमधून मतदारानं उमेदवारांना थेट इशाराच दिला आहे.

चिठ्ठीत नेमकं काय?

मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर इथं आणलेल्या आठ मतपेट्यांना सील नसल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला, त्यामुळं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, या कार्यकर्त्यांची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली. तर दुसरीकडे मतपेटीमध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यातून मतदारानं थेट उमेदवारांना इशाराच दिला आहे. "आम्हाला कोणीही विकत घेऊ शकत नाही, २००४ पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर बघा..." असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे.

Pune MLC Election: "2004 पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर..."; शिक्षक मतपेटीत मतदारानं टाकली चिठ्ठी; उमेदवारांना दिला इशारा
Marathwada Graduate: "परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम होणार"; मविआच्या प्रतापसिंह पाटलांना पहिल्या पसंतीतच निवडून येण्याचा विश्वास

दरम्यान, राज्यातील शिक्षकांच्या प्रतिनिधींसाठीची ही निवडणूक आहे. त्यामुळं शिक्षकांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी यांवरच प्रामुख्यानं या निवडणुकीच्या प्राचारात भर असतो. आत्तापर्यंत शिक्षकांना सातत्तानं आपल्या विविध मागण्या यापूर्वीच्या शिक्षक आमदारांकडं मांडल्या आहेत. यावर तोडगा काढण्याचं आश्वासनं अनेकदा दिली गेलीत, पण त्या पुढे मार्गी लागलेल्या नाहीत. २००४ नंतर भरती झालेल्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू होत नसल्यानं अनेकदा शिक्षकांनी आंदोलनं केली आहेत. पण आता पुन्हा एकदा हा मुद्दा एका शिक्षक मतदार असलेल्या व्यक्तीनं मतपेटीत थेट चिठ्ठीद्वारे चर्चेत आणला आहे.

Pune MLC Election: "2004 पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर..."; शिक्षक मतपेटीत मतदारानं टाकली चिठ्ठी; उमेदवारांना दिला इशारा
Eknath Shinde News: काँग्रेसच्या टीकेमध्ये PM मोदी लक्ष्य! एकनाथ शिंदेंच्या लागलंय जिव्हारी, नेमकं घडलंय तरी काय?

याद्वारे उमेदवारांशी थेट या मतपेटीद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न या शिक्षक मतदारानं केला आहे. त्यामुळं ही चिठ्ठी त्यातील मजकूर आणि निनावी असलेला मतदार यांची सध्या चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com