

BJP leadership update : मागील काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणता नेता विराजमान होणार, याची देशभरात चर्चा सुरू आहे. पक्षाचे नेते, पदाधिकारी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्याआधी पक्षाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा धक्का दिला आहे.
भाजपच्या संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेण्यात आला असून ४५ वर्षांच्या नितीन नबीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. नबीन हे सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत. पक्षाला बिहारमध्ये नुकताच ऐतिहासिक विजय मिळाला आहे. त्यामुळे या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. बिहारसह राष्ट्रीय राजकारणात याकडे एक रणनीती म्हणून पाहिले जात आहे.
नितीन नबीन यांचा संघटनात्मक अनुभव, तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी असलेले संबंध, प्रशासकीय क्षमतेमुळे त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही नियुक्ती १४ डिसेंबरपासून तत्काळ प्रभावाने लागू होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव व मुख्यालय प्रभारी अरूण सिंह यांनी हा आदेश जारी केला आहे.
अरूण सिंह यांच्या आदेशानुसार, ही नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बोर्डाद्वारे करण्यात आली आहे. नितीन नबीन हे नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये रस्ते विकास मंत्री आहेत. पटनातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते यावेळी चौथ्यांदा निवडून आले आहेत.
भाजपच्या विद्यार्थी मोर्चापासून नबीन यांनी पक्ष संघटनेत काम केले आहे. विविध पदे भूषविली आहेत. संघटनेतील एक कडक शिस्तीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच त्यांच्या निर्णयक्षमतेची अनेकदा कौतुक झाले आहे. बिहार भाजपमध्येही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. मात्र, राष्ट्रीय स्तरावर त्यांना पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.