Ajit Pawar News : 'अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता 30 टक्के लोकांना वाटतं तर..'; सी व्होटर सर्व्हेचा दावा !

Ajit Pawar News : सर्वाधिक पसंती कोणाला? काय सांगते आकडेवारी?
Ajit Pawar News :
Ajit Pawar News : Sarkarnama

Ajit Pawar has the ability to become Chief Minister : मागील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाबाबत जोरदार चर्चा घडून येत आहे. अनेक नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागले होते. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे आता वेगवेगळ्या दाव्यांना उधाण आले आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार, उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. तर आघाडीतील नेतेमंडळींकडूनही मुख्यमंत्रीपदाबाबत दावे प्रतिदावे सुरु आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाला आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shine) यांनी शिवसेनेत बंड केले. शिवसेनेच्या ४० आमदारांना आपल्या सोबत घेऊन, भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. राज्यातील सत्तासंघर्षप्रकरणी सुनावणी पुर्ण झाली असून निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. जर हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण येत आहे.

Ajit Pawar News :
Rahul Gandhi यांना बाँम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्या साठ वर्षीय व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक..

महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री निवडायचा प्रसंग आला तर नवीन मुख्यमंत्री कोण असणार? याविषयी तर्कवितर्कांना लढवले जात आहे. याचवेळी सी- व्होटर संस्थेनं केलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापेक्षा उध्दव ठाकरेंना अधिक पसंती मिळाल्याचं समोर आलं आहे. सी-व्होटरनं हे सर्वेक्षण 24 एप्रिल ते बुधवार (26 एप्रिल) या कालावधीत करण्यात आले.

सी व्होटरच्या सर्व्हेत देवेंद्र फडणवीस यांना 26 टक्के,अजित पवारांना 11 टक्के, उद्धव ठाकरेंना 28 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तर 35 टक्के लोकांनी माहित नसल्याचं म्हटलं आहे. या सर्व्हेत एक प्रश्न असाही विचारण्यात आला की, अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे? या प्रश्नाला तीन पर्यायांपैकी उत्तर देताना, ३० टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले आहे.

Ajit Pawar News :
Uddhav Thackeray News: ...तर मुख्यमंत्री म्हणून पुन्हा उध्दव ठाकरेंनाच पसंती! 'सी व्होटर'च्या सर्व्हेत नेमकं काय?

अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे?

होय : 30 टक्के

नाही : 33 टक्के

माहित नाही : 37 टक्के

एबीपी न्यूज - सी व्होटर या सर्वेक्षणाच्या आकडेवारीत असे दिसून आले की, 30 टक्के लोकांना वाटते की, अजित पवारांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. मात्र त्याच वेळी ३३ टक्के लोकांना अजित पवारांकडे मुख्यमंत्री होण्याची क्षमता नाही, असे वाटते आहे. तर 37 टक्के लोकांनी याबाबत माहिती नाही, किंवा सांगता येत नाही असे सांगितले.

(BY - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com