Beed Election: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार रोजगार देणार, बेरोजगारी दूर करणार, मतदारसंघाचा विकास करणार, मतदारसंघातन नवीन उद्योगधंदे आणणार, शेतमालाल हमी भाव मिळावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत आहेत.
विधासभेचे उमेदवार विकासाचे आश्वासन देत असताना मात्र परळी विधानसभा मतदारसंघात धनजंय मुंडे यांच्या विरोधात लढणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सर्व पोरांची लग्न लालून देण्याचे अजब आश्वासन दिले आहे.
आपल्या प्रचारात राजेसाहेब देशमुख म्हणाले, 'तरुण पोरांना विचारतात की नोकरी आहे का? उद्योगधंदा आहे का? माननीय पालकमंत्र्यांचा उद्योगधंदा चालत नाही तर तुमचा कुठे चालणार. असं असेल तर एकाही मुलाचे लग्न होणं मुश्किल आहे. पण साऱ्या पोरांना आश्वासन देतो मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न मी लावून देईल. सगळ्या पोरांना कामधंदा देऊ.'
राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष होते. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक नावे चर्चेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाले होते. तसेच काहीसे राजकीय चित्र परळी विधानसभेत धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यातील लढतीमुळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
राजेसाहेब देशमुख यांनी आपल्या प्रचारसभेत धनजंय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे मतदारसंघात कुठला उद्योगधंदा आणू शकले नाहीत. तरुणांना रोजगार देऊ शकले नाहीत. जिल्ह्यात फक्त हुकुमशाही सुरू आहे. दिसले त्याला दाबणे आणि दादागिरी सुरू आहे. निष्क्रिय आणि कुचकामी पालकमंत्री जिल्ह्यात आहेत, असा टोला देखील धनंजय मुंडेंना राजेसाहेब देशमुख यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.