Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांची इच्छा असेल तर...; वंचितसोबतच्या आघाडीच्या चर्चेवर काँग्रेसनं मांडली सडेतोड भूमिका

Prakash Ambedkar: मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांमध्येही समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याची भूमिका काँग्रेसनं मांडली आहे.
Congress_VBA
Congress_VBA
Published on
Updated on

Prakash Ambedkar: मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांमध्येही समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याची भूमिका काँग्रेसनं मांडली आहे. त्यासाठी विविध समविचारी पक्षांशी त्यांची चर्चाही सुरु आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचाही समावेश आहे. पण अद्याप वंचितसोबतच्या चर्चेतून कोणता तोडगा निघाला हे कळू शकलेलं नाही. त्यातच आता काँग्रेसनं वंचितसोबतच्या आघाडीच्या चर्चांवर आपली स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडली आहे.

Congress_VBA
Top 10 News: प्रशांत जगताप काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांना ठरलेत अडचणीचे? ते सुभाष देशमुखांचा भाजपला निर्वाणीचा इशारा

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटलं की, "काँग्रेस पक्षाची मुंबई महानगरपालिका निवडणुकीत लोकशाही व संविधानाची बांधिलकी ठेवणाऱ्या समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जाण्याची मनापासून इच्छा आहे. याकरिता अतिशय प्रामाणिकपणे निकराचे प्रयत्न आम्ही करत आहोत. याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीशी गेले काही दिवस सातत्याने अतिशय तळमळीने चर्चा सुरू आहे. आजही आमची चर्चा सुरू राहिली आहे. परम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची इच्छा असेल तर लवकरच ही चर्चा पूर्णत्वास जाईल. त्याचप्रमाणे CPI, CPIM, रिपब्लिकन पार्टी (गवई) या पक्षांशी चर्चा जवळपास पूर्णत्वास गेली आहे"

Congress_VBA
Prashant Jagtap: प्रशांत जगताप काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांना ठरलेत अडचणीचे? नेमकं काय कारण काय? जाणून घ्या

सचिन सावंत यांच्या या भूमिकेनुसार, वंचितकडून अद्याप काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळं युतीबाबतची चर्चा अद्याप पूर्णत्वास जाऊ शकलेली नाही. तर दुसरीकडं डावे पक्ष आणि रिपब्लिकन पार्टीपैकी गवई गटाशी काँग्रेसनं यशस्वीरित्या चर्चा पूर्ण केली आहे. त्यामुळं लवकरच त्यांचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. पण हे जागा वाटप केवळ वंचित बहुजन आघाडीमुळं अद्याप जाहीर झालेलं नाही, असंही सावंत यांच्या भूमिकेतून स्पष्ट होतं.

Congress_VBA
Pune Election: "आता त्यांना निर्णय घ्यायचाय, या लढाईत राहायचं की नाही"; ठाकरेंच्या सेनेचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा?

दरम्यान, दुसरीकडं वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक असलेल्या प्रकाश आंबेडकांनी काँग्रेसवरच आघाडी न होण्याचं खापर फोडलं आहे. तसंच काँग्रेसनं अपप्रचार करु नये असंही म्हटलं आहे. मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही, मी ज्या दिवशी बोलेल त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रात नाही तर देशभरात फटका बसेल, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com