Chhagan Bhujbal: ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यास दोघांचंही नुकसान! भुजबळांनी सांगितलं गणित

Chhagan Bhujbal: यावेळी त्यांनी मराठा समाजातील बुद्धिवादी वर्गावर देखील टीका केली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal: मराठा समाजाला जर ओबीसींमधून आरक्षण दिलं तर यामध्ये त्यांचंच नुकसान आहे. त्यामुळं मराठ्यांबरोबरच ओबीसींचं देखील नुकसान होणार आहे, असा दावा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. साम टीव्ही न्यूजच्या ब्लॅक अँड व्हाईट या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या विषयावर आपली सडेतोड भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठा समाजातील बुद्धिवादी वर्गावर देखील टीका केली आहे.

Chhagan Bhujbal
Top 10 News: फडणवीस सरकारच्या 'जीआर'नंतर आंबेडकरांचा नवा बॉम्ब ते जीएसटीवरुन सरकारचा मोठा गेम! खाण्यापिण्यासह प्रत्येक गोष्ट होणार महाग

विषाची परीक्षा का द्यावी?

एकीकडं ओबीसी नेते म्हणतात की हैदराबाद गॅझेटबाबत सरकारनं काढलेल्या जीआरचा ओबीसींवर काहीही परिणाम होणार नाही. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, "आम्ही विषाची परीक्षा का द्यावी. आम्ही गप्प का बसावं. कारण पुढच्या पिढ्या आम्हाला शिव्या देतील. म्हणतील तुम्हाला कळतं होतं, तुम्ही तिथे होता तर तुम्ही त्यावर हरकत का घेतली नाही. एकदा दस्ताऐवज तयार झाला तर तो कायमचा होतो. मग त्यावर कायमचं शिक्कामोर्तब होईल. त्यामुळं त्यामध्ये काही सुधारणा होईल का? यासाठी आम्ही आमच्यावतीनं शक्य तेवढा प्रयत्न करतो आहोत"

Chhagan Bhujbal
GST Reform: सरकारचा मोठा गेम! एका गोष्टीवर भरमसाठ वाढवला कर; खाण्यापिण्यासह प्रत्येक गोष्ट होणार महाग

कोर्टात जाऊन विचारावं लागेल

यासाठी आम्हाला न्यायालयात जाऊन या जीआरमधली शब्द रचना अशी आहे तर याची फोड काय करायची? ते तुम्ही सांगा हे आम्ही विचारणार आहोत. यामध्ये हे स्पष्टपणे सांगा की यांना हे आहे यांना नाही. तसंच मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत असा निकाल हायकोर्टानं आणि सुप्रीम कोर्टानं पण दिला आहे. त्यावर कोर्टांनी हे पण सांगितलं आहे. हे दोन्ही समाज एकच आहेत हे आपण मान्य केलं तर आख्खा महाराष्ट्र म्हणजे मराठा समाज कुणबी होईल, असंही यात कोर्टानं नमूद केलेलं आहे.

Chhagan Bhujbal
GST Reform: नवीन रोजगार निर्मिती अन्.... ; फडणवीसांनी सांगितलं जीएसटी बदलामुळं काय होणार फायदे

दोघांचही नुकसान

मराठा समाजात अत्यंत विद्वान लोक आहेत. यात अभ्यासू आहेत, राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, लेखक आहेत. पण हे सगळे लोक या मराठा-कुणबी विषयावर बोलतच नाहीत. उलट आम्हाला ओबीसीत घ्या, ओबीसीत घ्या असंच बोलत आहेत. मग यामुळं आमचंही नुकसान आणि तुमचंही नुकसान आहे. यामुळं परत गावागावात एकमेकांविरोधात भांडणं होत राहणार. मला मराठा नेते सांगतात की, मेडिकलला जो कटऑफ पाईंट आहे तो मराठा समजापेक्षा ओबीसींचा जास्त आहे. ईडब्ल्यूएसमध्ये पण हीच परिस्थिती आहे. कारण संख्या मोठी आहे. आता त्यांना हे कळतंय नाही की यामध्ये आपलं नुकसान होतं आहे. म्हणजेच त्यांचं नुकसान तर होतंच आहे तसंच आमचंही यामुळं नुकसान होतंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com