
GST Reform: केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले असून अनेक स्लॅब रद्द करण्यात आले आहेत, तर काही स्लॅब कमी करण्यात आले आहेत. याला सरकारनं सेकंड जनरेशन रिफॉर्म असं संबोधलं आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, यामुळं नवीन रोजगार निर्मितीसह अनेक बाबींमध्ये मोठा फायदा होणार असल्यांच सांगितलं जाते.
फडणवीस म्हणाले, "जीएसटी काऊन्सिलनं जे रिफॉर्म केले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो. प्रधानमंत्री मोदींच्या दूरदृष्टीनं 'वन नेशन वन टॅक्सच्या रुपानं' जीएसटी सुरु झाला. जीएसटी सुरु झाल्यापासून देशात जीएसटीचा लीडर महाराष्ट्र राहिलेला आहे. महाराष्ट्र सर्वाधिक जीएसटीत योगदान देत आहे. महाराष्ट्रानं जीएसटीचा जबरदस्त ग्रोथ रेट राखलेला आहे. या महिन्यातही सर्वाधिक कलेक्शन महाराष्ट्रानं केलं आहे.
तसंच ज्यावेळी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स आणण्याचं प्रधानमंत्र्यांनी घोषित केलं. हे रिफॉर्म्स अतिशय महत्वाचे आहेत. यातील काही स्लॅब्स काढून टाकण्यात आल्या आहेत. बहुतांश गोष्टी खालच्या स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. म्हणजेच एक प्रकारे लोकांवरील जीएसटीचं बर्डन कमी करण्याचं काम मोदींनी केलं आहे.
अशा प्रकारचे जे अप्रत्यक्ष कर असतात त्यात इतका मोठा बदल घडवणारा बदल होताना दिसत नाही पण तो मोदींनी केला आणि त्याला जीएसटी काऊन्सिलनं मान्यता दिली. याला जीएसटी काऊन्सिलमध्ये महाराष्ट्रानं पूर्ण समर्थन केलं. ज्यावेळी जीएसटीची अंमलबजावणी झाली त्याही वेळेस खूप जण म्हणायचे की खूप मोठी अडचण होईल पण ती झाली नाही.
दरम्यान आताही मला विश्वास आहे की, यामुळं व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, व्यापार बूस्ट होईल, नवीन रोजगार निर्मिती होईल, लोकांवरचा बोजा कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल, म्हणून हे सेकंड जनरेशन रिफॉर्म करण्याकरता मी प्रधानमंत्री मोदी याचं मनापासून आभर मानतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.