
Mumbai Politics : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने आपल्याला आठवडाभर धमकी आल्याचा मोठा दावा केला आहे. राजाश्रय असल्याने धमकी देणारे मोकाट सुटल्याचा आरोपही या नेत्याने केला आहे.
शरद पवारांच्या पक्षाचे नेते व प्रवक्ते विकास लवांडे यांनी एक्सवर एक्स पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांना धमकी देऊन हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा अंतरंग पुन्हा दाखवला. जे पोटात ते कधी तरी ओठात येतेच. हिंदू आणि हिंदुत्व यात खूप फरक आहे.
हिंदुत्ववादी हे हिंसक आणि मनुवादी असतात. त्यांना लोकशाही व भारतीय संविधान कधीच मान्य नसते. या भ्याड धमक्यांचा मी मागील आठवडाभर अनुभव घेतला आहेच. त्यांना हल्ली राजाश्रय असल्याने ते मोकाट सुटले आहेत. ही धर्मांधता RSS भाजपाच्या आशीर्वादाने सुरू आहे. बहुजनांचे अज्ञान हा त्यांचा मुख्य आधार असतो, असेही लवांडे यांनी म्हटले आहे.
इस्लाम खतरे में है म्हणणारे आणि हिंदू खतरे में है म्हणणारे, दोन्ही प्रवृत्ती एकच आहेत. त्यांना संविधान प्रेमी व भारतीय नागरिकांनी सर्व पातळीवर रोखले पाहिजे, असे म्हणत लवांडे यांनी इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीचा निषेध केला आहे. लवांडे यांच्यानंतर इतर नेत्यांकडून सावंत यांना आलेल्या धमकीचा निषेध केला जात आहे.
दरम्यान, इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्याला धमकी आल्याचा दावा केला आहे. त्यांनी कॉल रेकॉर्डिंगही पोस्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सावंत यांनी म्हटले आहे की, प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देत आहे.
मला अशा धमक्या नवीन नाहित पण या हरामखोरांचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत, यांच्या पोटात श्री शिव छत्रपतीं बद्दल काय विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डींग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापाला ही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही, असे सावंत यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.