
Nagpur News, 25 Feb : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी डॉ. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी संबंधित व्यक्तीचे कॉल रेकॉर्डिंग देखील शेअर केलं आहे.
यामध्ये इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण समाजाबाबत द्वेष पसरत असल्याचा आरोप करत त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सावंतांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये संबंधित व्यक्ती सावंत यांना धमकी देत शिवीगाळ करत आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबाबत देखील अवमानकारक वक्तव्य रेकॉर्डिंगमध्ये केल्याचं दिसत आहे.
मात्र, सांवत यांनी फेसबुक पोस्ट शेअर करताना ज्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) यांनी, सावंत यांना मी धमकी दिली नाही आणि तो माझा आवाजच नसल्याचा दावा केला आहे. शिवाय सावंत यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे आपणाला मनस्ताप झाला असून त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचंही कोरटकर यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना कोरटकर म्हणाले, "मला सकाळपासून अनेक फोन येत आहेमी धमकी दिली आहे. मात्र, सावंत यांना धमकी दिली आहे त्या रेकॉर्डिंगमधील आवाज माझा नाही. त्यांचा नंबरही माझ्याकडे नाही. मी कधी त्यांच्या संपर्कात देखील आलेलो नाही, असं स्पष्टीकरण कोरटकर यांनी दिलं.
तसंच, मी मागील 25 वर्षांपासून मी पत्रकारिता करतोय. माझ्याबद्दल लोकांना माहिती आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे. त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसाने इतक्या मोठ्या विषयावर आणि इतिहास संशोधकाला बोलण्याचा काही विषयचं नाही. मी अजून ऑडिओ ऐकलेला नाही.
मात्र, सकाळपासून ज्या पद्धतीचे मला फोन येत आहेत. त्यावरून एकूणच या सर्व प्रकरणाला जातीचा रंग दिल्याचं दिसतंय. त्यामुळे मी नागपूरचे (Nagpur) पोलिस आयुक्त आणि राज्याच्या सायबर प्रमुखांना अर्ज करणार आहे. हा खोडसाळपणा ज्यांनी कोणी केला आहे त्यांच्या विरोधात आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी देखील या प्रकरणाची शहानिशा न करता.
मला संपर्क न करता, डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे. त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. कारण, सकाळपासून शेकडो फोन मला आले. मी तो आवाज माजा नाही हे सतत नाकारत आहे. मी कधीही जातीवर कधीच कमेंट करत नाही. सायबरने चौकशी करावी. मला मनस्ताप झाला याच्याबाबत गंभीर तक्रार करणार. शिवाय माझ्याबाबत काय चुकीचं घडलं तर सावंत जबाबदार राहतील असंही कोरटकर यांनी म्हटलं आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतंच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर शेअर केलं आहे.
ज्यामध्ये "जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असं म्हणत या व्यक्तीने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तर सावंत यांनी प्रशांत कोरटकर यांचं नावं घेतल्यामुळे कोरटकर यांना अनेक लोकांना फोन करून या प्रकरणाचा जाब विचारायला सुरूवात केली आहे. यावरून त्यांनी आता आपण सावंत यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.