
Shivsena News : एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात जय गुजरात असा भाषणाच्या शेवटी नारा दिल्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर दिल्लीचे बूट चाटणारे असे म्हणत टीका केली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना गुजरात हा या देशाचा भाग आहे, तो काही पाकिस्तानचा प्रांत नाही, असे म्हणत जय गुजरात या शिंदेंनी दिलेल्या घोषणेचे समर्थन केले.
धाराशिव दौऱ्यावर असताना माध्यमाशी बोलताना प्रतापराव जाधव (Pratap Jadhav) यांना एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवरून कालच्या ठाकरेंच्या मेळाव्यात झालेल्या टीकेवर पलटवार केला. गुजरात हे या देशातील महत्वाचे राज्य आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या या राज्याचा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला त्यात काही वावगे नाही.
महाराष्ट्राचा स्वाभीमान राखत शिंदे यांनी गुजरातचाही सन्मान केला. ज्या समाजाच्या कार्यक्रमात शिंदे सहभागी झाले होते, त्या गुजराती समाजासमोर त्यांनी जय गुजरातचा नारा दिला. पण तो देत असताना त्याआधी एकनाथ शिंदे जय महाराष्ट्रही म्हटले, पण ते टीका करणारे सोयीस्कररित्या विसरले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही गुजरातमध्ये गेल्यानंतर जय गुजरातचा नारा दिला होताच. पण त्यांना कधी याबद्दल कोणी प्रश्न विचारत नाहीत.
उद्धव ठाकरेच नाही तर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जय गुजरात असा नारा दिलेला आहे, त्याच्या व्हिडिओ क्लीपही उपलब्ध आहेत. पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळं दिसत नाही, असा टोलाही जाधव यांनी यावेळी लगावला. गुजरात हा देखील पुर्वी संयुक्त महाराष्ट्राचा भाग होता, मुंबई ही त्यांचीही राजधानी होती. आजही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुजराती समाज गुण्यागोविंदाने राहतो.
मराठी भाषा, मराठी माणसाचा स्वाभीमान जागृत करतानाच आपण गुजराती लोकांचा आणि राज्याच्या विकासात असलेल्या त्यांच्या योगदानाचा सन्मान केला तर बिघडले कुठे? असा सवाल प्रताप जाधव यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाही कधी तरी विचारा, असंही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.