Jal Jeevan Mission : हर्षल पाटील एकटा नाही, आणखी बळी घेणार का सरकार? 'जलजीवन'ची तब्बल 35 हजार कोटींची थकबाकी!

Harshal Patil Suicide Jal Jeevan Mission : जलजीवनचा निधी राज्यांनी द्यावा, यासाठी केंद्र सरकारने राज्यांना पत्र 16 जूनला पत्र दिले होते. त्यामुळे या योजनेासठी राज्यांना तरतूद करावी लागणार आहे.
Harshal Patil
Harshal Patil sarkarnama
Published on
Updated on

Jal Jeevan Mission Dues : 'जलजीवन'चे काम करूनही तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांची थकबाकी न मिळाल्याने सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेत आत्महत्या केली. हर्षलच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, एकटा हर्षलच नाही तर हजारो कंत्राटदार जलजीवन मिशनच्या काम करूनही पैसे मिळाले नसल्याचे अडचणीत आहेत. 'जलजीवन'ची तब्बल 35 हजार कोटींची थकबाकी आहे.

जलजीवन मिशन योजना ही केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना होती. या योजनेसाठी केंद्राने तब्बल महाराष्ट्रासाठी पाच हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ 1600 कोटीच रुपये दिल्याचे समोर आले आहे. त्यातच 16 जूनला आदेश काढत जलजीवन योजनेचे पैसे राज्य सरकारने द्यावेत असे सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या जलजीवनसाठी 35 कोटींचा आराखडा होता. मात्र, केंद्राकडून या योजनेचे 19 हजार 259 रुपये येणे बाकी आहे. तर, राज्य सरकारकडे 16 हजार 363 कोटींची थकबाकी आहे. 2024 ला केंद्राकडून पाच हजार कोटींची तरतूद प्रत्यक्षात १६०० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कंत्राटदार अडचणीत आले आहेत.

Harshal Patil
Harshal Patil Case : "पैसे नाहीत तर 'शक्तीपीठ'चा अट्टाहास कशासाठी? तुमच्या कर्माची फळ..."; कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर शेतकरी नेता फडणवीसांवर संतापला

निधीसाठी अर्थविभागाला पत्र

जलजीवनचा निधी राज्यांनी द्यावा, यासाठी केंद्र सरकारने राज्यांना पत्र 16 जूनला पत्र दिले होते. त्यामुळे या योजनेासठी राज्यांना तरतूद करावी लागणार आहे. जलजीवनसाठी 3900 कोटीचा निधी अजित पवारा यांच्या अर्थविभागाने द्यावा यासाठी जलजीवन विभागाकडून पत्र दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, निधी मिळ नसल्याने जलजीवनची कामे अर्धवट असून जल जीवन योजनेची मुदत मार्च 2025 मध्ये संपली आहे.

Harshal Patil
ED raid update : ‘ईडी’चा अंबानींना झटका, उद्योगविश्वात खळबळ! अधिवेशन सुरू असतानाच कंपन्यांवर छापे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com