Harshal Patil Case : "पैसे नाहीत तर 'शक्तीपीठ'चा अट्टाहास कशासाठी? तुमच्या कर्माची फळ..."; कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर शेतकरी नेता फडणवीसांवर संतापला

Harshal Patil Death Case : "सध्या राज्यात ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती भयावह झाली असून अनेक कुटूंबे आर्थिक दृष्ट्या रसातळाला गेलेत. दीड ते दोन वर्षांपासून झालेल्या कामांचे पैसे ठेकेदारांना मिळत नाहीत. मात्र, तुमचे आमदार-खासदार टक्केवारी घेऊन मदमस्त आहेत."
 Raju Shetti Slams Govt on Harshal Patil Death
Contractor Suicide in Maharashtra | Raju Shetti Slams Govt | Harshal Patil CaseSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 24 Jul :शेतकरी आत्महत्येनंतर राज्यात आता ठेकेदार आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री महोदय तुमच्या कर्माची फळ सामान्य जनता भोगू लागली आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील हर्षल पाटील नावाच्या तरूण सरकारी कंत्राटदराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जलजीवन मिशनचे काम केलं मात्र वेळेत बिलं मिळत नसल्याच्या नैराश्यातून हर्षलने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे.

हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर विरोधकांसह सरकारी कंत्राटदारांनी महायुती सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर राज्यात आता ठेकेदार आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री महोदय कर्माची फळ सामान्य जनता भोगू लागली आहे. सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या 35 वर्षाच्या तरूणाने आत्महत्या केली. त्याला 5 वर्षाची लहान मुलगी आहे. एकीकडे ठेकेदारांची बिले देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत.

 Raju Shetti Slams Govt on Harshal Patil Death
ED raid update : ‘ईडी’चा अंबानींना झटका, उद्योगविश्वात खळबळ! अधिवेशन सुरू असतानाच कंपन्यांवर छापे...

मात्र, शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून 20 हजार कोटींचं कर्ज काढून 86 हजार कोटींचा रस्ता करण्याचा अट्टाहास कशासाठी करत आहात? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. तसंच यावेळी त्यांनी, तुम्ही सामान्य जनतेचा बळी घेऊन जो कारभार करत आहात तो आता शेतकऱ्यांपासून कंत्राटदारांच्या आत्महत्यापर्यंत पोहचला असल्याचं म्हटलं.

 Raju Shetti Slams Govt on Harshal Patil Death
Harshal Patil : "फडणवीस अन् 2 डेप्युटींनी राज्याचं स्मशान केलंय..."; सांगलीतील कंत्राटदाराच्या आत्महत्येवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

सध्या राज्यात ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती भयावह झाली असून अनेक कुटूंबे आर्थिक दृष्ट्या रसातळाला गेलेत. दीड ते दोन वर्षांपासून झालेल्या कामांचे पैसे ठेकेदारांना मिळत नाहीत. मात्र, तुमचे आमदार-खासदार टक्केवारी घेऊन मदमस्त आहेत, असा हल्लाबोल शेट्टी यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com