Maratha Reservation : ...तर 20 जानेवारीपर्यंत मराठा समाज अयोध्येला जाण्यास मोकळा होईल; जरांगे पाटलांचे मोठे विधान

Political News : मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj jarange News : प्रभू श्रीरामांनी केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी द्यावी. श्रीरामांच्या चरणी आम्ही साकडे घातले आहे की, मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या काळात लवकर मार्गी लागावा. हा तिढा 20 जानेवारीपर्यंत सुटला तर मराठा समाज अयोध्येला जाण्यास मोकळा होईल, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी 22 जानेवारीला अयोध्येला श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे स्पष्ट करीत काहीही झाले तर येत्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे सांगितले.

आम्ही कट्टर हिंदू आहोत. अमुकच तारीख निवडली याच्याशी श्रीराम मंदिर लोकार्पणाचा काहीच संबंध नाही. मुंबईत 18 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू केली असल्याने 20 जानेवारी ही तारीख निवडली असल्याचे स्पष्ट करीत अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर होत असल्याचा आम्हालापण आनंद होत आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil
Bharat Gogawle : भरत गोगावलेंचं अंबाबाईला साकडं, म्हणाले, 'या महिन्यात...'

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर ठाम असल्याचे सांगत जर येत्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर आम्ही येत्या काळात मुंबईमध्ये आनंदोत्सव साजरा करू, असे मनोज जरांगे पाटील मीडियाशी बोलताना म्हणाले.

छत्रपती शिवरायांच्या काळात जास्त महत्त्व विचार आणि ध्येयाला दिले जात होते. त्याप्रमाणे यामध्ये ध्येय आणि सूत्र ठरले आहे. गोरगरीब मराठा समाजाच्या ध्येयासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सांगत मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकार्पण सोहळ्याचा आनंदच

येत्या २० तारखेला मराठा समाज पुन्हा मुंबईकडे निघणार आहे. त्यावेळी २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे, त्याचा आनंद सर्वांना होणार आहे. त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, दुसरीकडे गेल्या चार महिन्यापासून मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करीत आहे, त्यासाठी सरकारशी आमची चर्चा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News : आम्ही मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला, त्यांच्या शब्दाचा सन्मान केला, पण..

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com