Jayant Patil Letter CM Fadnavis : '...तर अवघे 70 ते 80 रुपये लीटर पेट्रोल-डिझेल मिळेल', जयंत पाटलांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, इंधनाचे भाव कमी करण्याचा सांगितला मार्ग!

Jayant Patil suggests way to reduce fuel prices: जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पेट्रोल डिझेलच्या किंमती 30 ते 40 रुपयांनी कमी करण्याचा मार्ग सांगितला आहे.
Jayant Patil has urged Chief Minister Devendra Fadnavis to remove the VAT surcharge on petrol and diesel in Maharashtra
Jayant Patil has urged Chief Minister Devendra Fadnavis to remove the VAT surcharge on petrol and diesel in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil letter to Devendra Fadnavis: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीमध्ये माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचा राजमार्ग सांगितला आहे.

आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. खाद्य तेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य सरकार इंधनावर व्हॅट आणि सरचार्ज आकारते जे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे २५६ व्हॅट १०.१२ रुपये प्रति लिटर सरचार्ज लावला जातो तर डिझेलवर अंदाजे २४१६ व्हॅट ३ रुपये प्रति लिटर सरचार्ज लावला जातो.

राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रह करून टाकावा. यामुळे आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल व डिझेल थेट ७०-८० रुपयात मिळू शकते, असे झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Jayant Patil has urged Chief Minister Devendra Fadnavis to remove the VAT surcharge on petrol and diesel in Maharashtra
Shivsena UBT : ठाकरेंचा मध्यरात्री फडणवीसांना फोन अन् महापालिकेतील 'त्या' प्रस्तावाला तडकाफडकी स्थगिती, शिंदेसेनेला मोठा झटका

राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. यामुळे केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल.

कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, आपण या सुचनेचा सकारात्मक विचार कराल व तात्काळ पेट्रोल डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रह करून नागरिकांना दिलासा द्याल अशी अपेक्षा देखील जयंत पाटील यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

इंधन तुटवडा मान्य करा - वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, 'इंधनाचा तुटवडा आहे हे मान्य करा, भविष्यात देखील होणार आहे. एअर इंडियाचे विमान देखील रद्द होत आहे. लाॅकाडाईन सारखी परस्थिती येणार आहे.

आम्ही आवाहन करतोय की, तुमच्याकडील पैसे सुरक्षीत ठेवा, फार काही कुठे गुंतवणूक करू नका. सरकारवर विश्वास ठेऊन गुंतवणूक केली तर ती परत येणार नाही. कारण बँका देखील रिकाम्या केल्या आहेत. बँक देखील भविष्यात उद्धवस्त होतील. देश संकटात आहेत मात्र यांनी इव्हेंटवर लक्ष दिले आहे.'

Jayant Patil has urged Chief Minister Devendra Fadnavis to remove the VAT surcharge on petrol and diesel in Maharashtra
Maharashtra Politics : 'पेट्रोलचे दर 120 ते 130 रुपयांवर जातील, लाॅकडाऊन...', मोठ्या नेत्याने व्यक्त केली भीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com