Maharashtra Politics : 'पेट्रोलचे दर 120 ते 130 रुपयांवर जातील, लाॅकडाऊन...', मोठ्या नेत्याने व्यक्त केली भीती

Jayant Patil On Petrol Prices Lockdown : एका डाॅलरची किंमत 100 पार होईल आणि पेट्रोल डिझेलचे दर हे 120 ते 130 पर्यंत वाढतील, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil News : अमेरिका-इराण संघर्षामुळे जगावर आर्थिक संकट आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले. दरम्यान, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात पेट्रोलचे दर 120 ते 130 रुपयांवर जातील, असे भाकीत केले आहे.

ते म्हणाले, एक महिना थांबला तर आज एक डाॅलर 96 रुपयांना मिळतोय तो 100 रुपयांना मिळेल. पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल.

'मी मोबाईलवर पाहिले वाशिमला अकोलानाका म्हणून जागा आहे. तेथे पेट्रोल घ्यायला लोकांची कॅन घेऊन रांग लागली आहे. त्या कॅनने पेट्रोलसाठी ते एकमेकांना मारत आहे. पेट्रोल-डिझेल घेण्यासाठी भांडण होतं आहे. कोरोनाच्या वेळी लाॅकडाऊन लागला. आता आपोआप लाॅकडाऊन करण्याची परिस्थिती होते की काय याची मला भीती वाटायला लागली आहे.', असे देखील ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'देशाचे गृहमंत्री भाषण केलं आपल्याकडे सहा महिन्यांचा कोटा शिल्लक आहे. काही काळजी करू नका. त्यांच्या भाषणाला १५ दिवस होण्याआधीच. त्यांचा नेता आता सांगातोय की बाहेर फिरू नका, परदेशात जायचं बंद करा, सोनं खरेदी करू नका अन् बरंच काही'

Jayant Patil
Ministers Convoy: जनतेच्या मनासारखं! CM फडणवीसांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्यावर

'अशीच भूमिका 2013 ला मनमोहन सिंगांनी घेतली होती. तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले होते की आर्थिक स्थिती डोलायला लागली आहे. आणि आता पंतप्रधानांनी घोषणा केली आहे तर ते म्हणतायेत की कुणी थट्टा करू नका. मंत्र्यांच्या मागे १० ते १५ गाड्या जातात. लोक आपले बघत बसतात.', अशी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Jayant Patil
Narendra Modi fuel crisis : महत्वाची बातमी : PM मोदींच्या आवाहनाने खळबळ उडालेली असतानाच पेट्रोलियम मंत्र्यांनी जाहीर केली इंधन साठ्याची स्थिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com