Shivsena UBT : ठाकरेंचा मध्यरात्री फडणवीसांना फोन अन् महापालिकेतील 'त्या' प्रस्तावाला तडकाफडकी स्थगिती, शिंदेसेनेला मोठा झटका

Devendra Fadnavis and Aaditya Thackeray : मुंबई महापालिकेची सुधारणा समिती ही शहरातील मोठे बांधकाम प्रकल्प, रस्ते सुधारणा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देणारी अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते. ठाकरे यांनी या समितीमार्फत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप केला होता.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray’
Aaditya Thackeray’s allegations triggered action as Devendra Fadnavis halted four major BMC proposals linked to the Shinde Sena faction.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 28 May : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यरात्री मातोश्रीवरून फोन गेल्यानंतर मुंबई महापालिकेच्या सुधारणा समितीमार्फत घेतल्या जाणाऱ्या चार मोठ्या निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, ही सुधारणा समिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्चस्वाखाली कार्यरत असल्याने या घडामोडींना मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांवरील दोन भूखंडांचे हस्तांतरण, सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव, तसेच काही उपनगरीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावांना स्थगिती देण्यात आली आहे.

त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीने कारवाई केल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप करत मुंबईतील मोक्याच्या जमिनी खासगी हातात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray’
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा टोकाचा निर्णय! ना मंडप, ना पाणी; आता थेट रखरखत्या उन्हात उपोषण

त्यांनी सेव्हन हिल्स रुग्णालय, उपनगरीय रक्तपेढ्या, वांद्रे रिक्लमेशन आणि मलबार हिल ग्रीन झोनसंदर्भातील प्रस्ताव वादग्रस्त असल्याचा दावा केला. मुंबई महापालिकेची सुधारणा समिती ही शहरातील मोठे बांधकाम प्रकल्प, रस्ते सुधारणा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देणारी अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते. सध्या या समितीचे अध्यक्ष विपुल दोशी आहेत.

ठाकरे यांनी या समितीमार्फत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधून या प्रस्तावांबाबत माहिती दिली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray’
Vikas Lawande News: जामीन मिळताच विकास लवांडेंची नवी फेसबुक पोस्ट; वारकरी संप्रदायाचा पुन्हा उल्लेख

त्यानंतर फडणवीसांनी भाजपच्या नगरसेवक आणि नेत्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आणि संबंधित चारही प्रस्तावांना तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींमुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गट आणि भाजपमध्ये पडद्यामागे काही राजकीय हालचाली सुरू आहेत का, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com