Pune Metro Update: स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर दोन नव्या स्थानकांना मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Swargate-Katraj Metro Line Balajinagar Bibwewadi : मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेत पुणे मेट्रो मार्गिक 1 मार्गावर स्वारगेट ते कात्रज या मार्गावर दोन स्थानकांना मान्यता दिली आहे.
Swargate Katraj Pune Metro
Swargate Katraj Pune MetroSarkarnama
Published on
Updated on

New Pune Metro Stations Approval: स्वारगेट ते कात्रज या पाच किलोमीटरच्या मेट्रो मार्गीकेवर पूर्वीच तीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये मार्केट यार्ड, पद्मावती व कात्रज या स्थानकांचा समावेश होता.

मात्र, बालाजीनगरमध्ये स्थानक व्हावे अशी मागणी करण्यात येत होती. तसा प्रस्ताव देखील देण्यात आला. अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या टप्पा-1 अंतर्गत स्वारगेट–कात्रज या मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक प्रकल्पांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे. ही पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे.

याशिवाय पुणे–लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारणीसाठी देखील बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे औद्योगिक, निवासी व व्यावसायिक विकासाला नवी गती मिळेल. वाहतूक कोंडीतून सुटका होऊन नागरिकांना दिलासा मिळेल.

Swargate Katraj Pune Metro
CM Rekha Gupta Attacked: CM रेखा गुप्ता यांना कानाखाली मारल्या; भाजपच्या दिल्लीतील जनता दरबारात हल्लेखोराचा गोंधळ

वडाळा ते गेटवे मेट्रो

अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी अत्याधुनिक AC गाड्यांची खरेदी, ठाणे–नवी मुंबई विमानतळ एलिव्हेटेड रोड, मुंबई मेट्रो मार्गिका ११ (वडाळा–गेटवे ऑफ इंडिया), नागपूरमध्ये रिंग रोड व नवनगर उभारणी आदी प्रकल्पांबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती प्राप्त होईल.

Swargate Katraj Pune Metro
BEST Election Results : "ठाकरेंना जागा दाखवली, ब्रँडच्या बॉसला..." बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा ठाकरे बंधुंवर पहिला वार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com