
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या आणि भाजप प्रवेशाच्या चर्चा सध्या चर्चेचा विषय होत्या.
जितेंद्र आव्हाड यांनी यावर स्पष्ट प्रतिक्रिया देत राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं.
आज जयंत पाटील यांनी स्वतः विधान देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार अशा चर्चा सुरू होत्या. ते भाजपमध्ये जाऊन सत्तेच्या सारीपाटावर राजकीय खेळ खेळतील असेही बोलले जात होते. दरम्यान त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले होते. पण आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही, असे सपष्टीकरण दिले आहे. मात्र याबाबत जयंत पाटील यांनी कोणतेच स्पष्टीकरण दिले नव्हते. पण आज (ता.14) जयंत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी पत्रकार आणि प्रसार माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. (NCP Sharadchandra Pawar state president Jayant Patil finally put an end to persistent rumors about his resignation from the party and a potential shift to BJP)
जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या भाजप प्रवेशासह त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा दिल्याची चर्चा राज्यभर पसरली होती. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेसह त्यांना भाजपकडून ऑफर आल्याचे समोर आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना थेट ऑफर देताना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न करू असे म्हटलं होते.
पण आता जयंत पाटील हे स्वत: समोर येत यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, मी अद्याप अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच भाजप असो किंवा इतर कोणताही राजकीय पक्ष त्याच्याशी किंवा त्यांनी माझ्याशी प्रवेशासाठी संपर्क केलेला नाही. पण मंगळवारी (ता.15) पक्षाची सर्वसाधारण बैठक होणार असून या गोष्टींची येथे चर्चा होईल. त्यानंतर सगळ्या गोष्टी क्लेअर होती, असेही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच जयंत पाटील यांनी, आजही मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण वारंवार विनायकारण अशा पद्धतीने पक्ष प्रवेशाच्या बातम्या केल्या जात असल्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आपण त्या का धुडकावत नाही याचे कारण सांगताना ज्या बातम्या हळूहळू विरून जातात त्याच्या आपण बोलत नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी गेल्या काही दिवसांत सुरू असणाऱ्या पक्षप्रवेश आणि राजीनाम्याच्या बातम्यांवरून जयंत पाटील यांनी नाराजी वक्त केलीय. त्यांनी, एखाद्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणसाबद्दल एवढ्या वावड्या उठवणे आणि तो कुठल्या पक्षात जाणार याचाही निर्णय पत्रकारच घेत आहेत, जे योग्य नाही. पण सध्या पत्रकार इतके सेन्सिटिव्ह बनले आहेत की कुणी कुणाशी बोललं तरी त्याची बातमी होते.
एखादा साध्या कामासाठी जरी कोणाला कोणी भेटलं तरी त्याच्याबाबत बातम्या होतात. माझ्याही बाबतीत अशी बातम्या केल्या. ज्यात तथ्य नाही. असो पण आता मी विधिमंडळात जाणार आहे. तेथे भाषण करणार आहे. जशा या बातम्या केल्या तशी सभागृहातल्या दोन-चार बातम्या करा असा टोला पत्रकारांना लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.